खूप कंफ्युज असतात 'या' राशीचे लोक, यांच्यावर प्रेम करणं ठरू शकते डोकेदुखी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 02:44 PM2020-03-05T14:44:35+5:302020-03-05T14:54:44+5:30
या राशीचा पार्टनर निवडाल तर सतत भांडण करण्याची वेळ येऊ शकते.
कपल्सचे स्वभाव हे त्यांचे अफेअर्स किती टिकणार आहे यासाठी जबाबदार असतात. सुरूवातीला सगळं काही चांगलं आणि अट्रॅक करणारं असल्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीला कमिट करत असतो. पण नंतर स्वभाव न पटल्यामुळे आणि जुळवून घेता येत नसल्यामुळे ब्रेकअप होतं. आज आम्ही तुम्हाला कोणत्या राशीची मुलं फार गोंधळलेली असतात आणि त्यांना स्वतःचं नात टिकवणं त्यांना जमत नाही. अशा राशीच्या मुलांसोबत सांगणर आोहत. अशा मुलांसोबत जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये राहत असाल तर कधीही त्रास होऊ शकतो.
मिथुन
मिथुन राशीचे लोक प्रेमात हक्क दाखवण्यासाठी ओळखले जातात. अनेकदा मिथुन राशीचे लोक प्रेमात समोरच्या व्यक्तीचं म्हणणं न ऐकता स्वतःचं मत लादण्याचा प्रयत्न करत असतात. पार्टनरला समजून न घेता बोलण्याचा प्रय़त्न करत असतात. त्यामुळे भांडणं होतात.
कुंभ
प्रत्येक नात्यात स्पेस देणं महत्वाचं असतं. कुंभ राशीच्या लोकांना असं वाटत असतं की त्यांच्या पार्टनरला पर्सनल स्पेस जास्त हवी असते. म्हणूनच ते आपल्या पार्टनरपासून लांब जातात. कारण त्यांना त्याच्या स्वभावातील चुकीचे विचार किंवा चुकीच्या सवयी दिसत नसतात.
वृषभ
वृषभ राशीचे लोक खूपचं जिद्दी असतात. त्यांचा असा स्वभाव त्यांच्यासाठी खूपच घातक ठरत असतो. पण या राशीचे लोक शालिन सुद्धा असतात. आपल्या बोलण्यातून ते समोरच्या व्यक्तीचं मन जिंकून घेत असतात. पण नेहमी स्वतःच्या मनाप्रमाणे वागण्याचा आग्रह असल्यामुळे त्यांचं आणि पार्टनरचं सतत भांडण होत असतं.
वृश्चिक
वृश्चिक राशीचे लोक खुप पॅशनेट असातात. इतकंच नाही तर डॉमिनेटींग स्वभावाची असतात. रिलेशनशीपमध्ये असताना वृश्चिक राशीचे लोकं शक्की स्वभावाचे सुद्धा असतात. म्हणूनच त्याची पार्टनरसोबत सतत भांडण होत असतात. रागात असल्यावर त्यांना कोणातंही ऐकून घ्यायचं नसतं नात्यावर याचा नकारात्मक परिणाम होत असतो. ( हे पण वाचा-ती आपल्याशी फ्लर्ट करतेय का? 'हे' संकेत नक्की देतील उत्तर)
मेष
मेष राशीचे लोक जिद्दी आणि तापट स्वभावाचे असतात. त्यांच्य प्रत्येक गोष्टीला पार्टनरने होकार द्यायाल हवा असं त्यांना वाटत असतं. या राशीच्या लोकांमध्ये पेशंस खूप कमी असतात. आपली एखादी गोष्ट चुकिची असेल तरी पार्टनरला स्वतः कसे योग्या आहे ते सांगू शकतो. ( हे पण वाचा-'ही' लक्षणं दिसली तर समजा तुमची गर्लफ्रेंड लवकरच करणार तुम्हाला टाटा-बाय बाय)