या कारणांमुळे तरुण-तरुणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे करतात पसंत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 01:06 PM2018-06-21T13:06:18+5:302018-06-21T13:06:18+5:30

अनेक तरुण-तरुणी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. तरुणांचा कल लिव्ह इन रिलेशनशिपकडे इतका का आहे याची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.  

For these reasons young people want to live in relationship | या कारणांमुळे तरुण-तरुणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे करतात पसंत

या कारणांमुळे तरुण-तरुणी लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे करतात पसंत

गेल्या काही वर्षांमध्ये लिव्ह-इन-रिलेशनशिपचं फॅड भारतात चांगलंच वाढलं आहे. याची कारणेही वेगवेगळी असू शकतात. एकतर लग्नातील वेगवेगळ्या अडचणींमुळे तरुणांचा लग्नाबाबत नकारात्मक दृष्टीकोनही बघायला मिळतो. आजकालचे काही किंवा एका क्लासमधील तरूण असा विचार करतात की, लग्न करणे हा त्यांचा खाजगी निर्णय आहे. त्यात घरच्यांनी हस्तक्षेप करु नये. त्यामुळे अनेक तरुण-तरुणी लिव्ह इन मध्ये राहण्याचा निर्णय घेतात. तरुणांचा कल लिव्ह इन रिलेशनशिपकडे इतका का आहे, याची काही निरीक्षणे खालीलप्रमाणे सांगता येतील.  

1) एकमेकांना जाणून घेणं

लग्न करण्याआधी एकमेकांना चांगल्याप्रकारे जाणून घेणे हे एक या नात्याचं मुख्य कारण असू शकतं. सोबत राहिल्याने दोघांनाही एकमेकांच्या स्वभावांची, सवयींची माहिती मिळते. त्यानुसार ते ठरवू शकतात की, ते एकमेकांसोबत आयुष्यभर राहू शकतील कि नाही. 

2) प्रेम वाढतं?

बरेच दिवस एकत्र राहिल्याने एकमेकांमधील प्रेम वाढतं असं मानलं जातं. काही प्रमाणात हे बरोबरही असावं. लग्नाआधी दोघांमधील नातं आणखी घट्ट व्हावं हे सुद्धा या नात्यात अडकण्याचं कारण असू शकतं. प्रेम वाढलं तर चांगलीच गोष्ट आहे आणि नाही वाढलं तर तेही कळेलच.

3) आर्थिक स्थैर्य

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहताना तरुण-तरुणी दोघेही आपापल्या नोकरीवर निर्भर असतात. एकमेकांवर अवलंबून राहत नसतात. घरातील खर्च वाटला गेला असतो. त्यामुळेही या नात्यात अनेकांना इंटरेस्ट असतो. कारण कोणतही आर्थिक दडपण त्यांच्यावर नसतं. 

4) स्वातंत्र्य

आजकालचे तरुण-तरुणी स्वतंत्र विचारांचे असतात. मुलगा असो वा मुलगी दोघांनाही त्यांचं स्वातंत्र हवं असतं. काही लोकांना लग्न करुन स्वत:ला एका साच्यात बांधून घ्यायचं नसतं. त्यामुळेही काही लोक लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणे पसंत करतात. 

5) जबाबदाऱ्यापासून दूर पळणे

आजच्या पिढीतील सर्वांनाच नाही पण काहींना जबाबदाऱ्यांची भीती वाटते. लग्न केल्यास पती-पत्नीवर एकमेकांची जबाबदारी असते. पण लिव्ह-इनमध्ये असं काही नसतं. त्यामुळेही काही तरुण हे नातं स्विकारतात. 

6) घटस्फोटाची गरज नाही

लिव्ह-इनमध्ये पार्टनरसोबत कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर तुम्ही विचार करुन त्याला सोडू शकता. त्यांना जर वाटत असेल की, त्यांचं नातं पुढे जाऊ शकत नाही तेव्हा ते सहज वेगळे होऊ शकतात. 

7) परिवाराचं टेन्शन नाही

अनेकदा काही मुलींना किंवा काही मुलांना पार्टनरच्या फॅमिलीसोबत जुळवून घेण्यास अडचण असते. लग्न झाल्यावर दोन परिवारांची जबाबदारी आपसूक येते. अशात काहींना ही जबाबदारी नको असते. त्यामुळेही काही लोक हे लिव्ह-इनचा मार्ग धरतात.
 

Web Title: For these reasons young people want to live in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.