बॉयफ्रेंडचं जगणं मुश्किल करतात या ६ प्रकारच्या गर्लफ्रेंडस्, बघा तुमची आहे का यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 05:02 PM2020-01-21T17:02:17+5:302020-01-21T17:04:00+5:30
सगळ्यांना असं वाटतं असतं की पार्टनरने फक्त त्यांचच म्हणणं ऐकायला हवं.
(image credit- rebel circus)
सगळ्यांना असं वाटतं असतं की पार्टनरने फक्त त्यांचच म्हणणं ऐकायला हवं. तसंच त्यांना विचारल्याशिवाय कोणतंही कामं करू नये, पण विशेषतः मुली काहीवेळा आपल्या पार्टनरकडून खूप जास्त अपेक्षा ठेवून असतात. तसंच आपल्या पार्टनरवर हक्क दाखवत असताना अरेरावी सुद्धा करतात. अनेकदा काही मुली इतक्या पजेसिव्ह होतात. कि त्या पार्टनरवर गुप्तपणे लक्ष ठेवून असतात. काहीजणी इतक्या कहर करतात, कि संशय घेऊन आणि प्रश्न विचारून पार्टनरच्या नाकात दम आणून सोडतात. आज आम्ही तुम्हाला अशा प्रकारच्या गर्लफ्रेडबद्दल सांगणार आहोत ते वाचून तुम्हाला आपली पार्टनर कशी आहे ते कळेल.
डोमिनेटिंग गर्लफ्रेंड
(image credit- relationship conseling services)
अशा स्वभावाच्या मुली पार्टनरवर दादागिरी करण्यात जास्त इन्टरेस्टेड असतात. सगळं काही आपल्यालाच कळतं अशा अविर्भावात त्या असतात. पार्टनरचे मत विचारत न घेणे, सतत आपणच कसे योग्य आहोत ते दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.
पजेसिव्ह गर्लफ्रेंड
(image credit- factordaily.com)
तुम्ही कुठल्या मुलासोबत किंवा फिमेल सोबत फिरायला जात असाल तर पार्टनर हे आवडत नाही. तर तुमची पार्टनर पजेसिव्ह असू शकते. म्हणून प्रत्येक गोष्टींला रोकठोक करत असते. कारण तुम्हाला गमावण्याची भीती पार्टनरच्या मनात असते.
इमोशनली ब्लैकमेल
(image credit-relazioniautentiche)
जर तुमची पार्टनर तुम्हाला इमोशनली ब्लॅकमेल करत असेल तर तुम्हाला भविष्यात महागात पडू शकतं. कारण भावनेच्या भरात आणि रडायला आल्यामुळे पार्टनरला काहीही कबूल करायला लावू शकतात. अशा वेळी तुम्ही परिस्थितीचं भानं ठेवून वागायला हवं. पार्टनरच्या बोलण्यात न येता तठस्थपणे विचार करायला हवा.
संशयी स्वभाव
काहीजणांना आपल्या पार्टनर सतत संशय घेण्याची सवय असते. जर तुमची गर्लफ्रेंड तुमचा फोन सतत चेक करत असेल तर तिला तुमच्यावर संशय आहे. काही संशयी वृत्तीच्या लोकांना सतत प्रश्न विचारण्याची सवय असते. तुमचा पार्टनर असं वागत असेल तर याचा तुम्हाला मानसीक त्रास होऊ शकतो.
चिपकू
(image credit- for every mom)
अनेक मुली या आपल्या पार्टनरला सतत चिकटून असतात कामाच्या ठिकाणी असो किंवा कॉलेजमध्ये असो सतत आपल्या पार्टनरला चिकटून असतात. यामुळे अनेकदा मुलांची डोकेदुखी वाढू शकते. सतत एकाच व्यक्तीशी बोलून किंवा सहवासात राहून बोअर होण्याची शक्यता असते.
स्वतःची चुक मान्य न करणे
(image credit-crosswalk.com)
काही मुलींना मीपणा आणि अहंकार इतका जास्त असतो की स्वतःची चूक कधीच त्यांना दिसून येत नाही. नेहमी पार्टनरला कसं चुकिचं ठरवता येईल याचा विचार करत असतात. अनेकदा भांडण झाल्यानंतर मुली स्वतःची चूक असेल तरी ती मान्य करायला तयार होत नाहीत. त्यामुळे पार्टनरचा इन्टरेस्ट कमी होण्याची शक्यता असते.