लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याआधी मुलींनी जाणून घ्या या 5 गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 12:27 PM2018-05-21T12:27:17+5:302018-05-21T12:27:17+5:30

तुम्ही लिव्ह-इनमध्ये राहण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे ठरेल. जेणेकरुन तुम्हाला मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागणार नाही.  

Things girls must know about live in relationships | लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याआधी मुलींनी जाणून घ्या या 5 गोष्टी

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याआधी मुलींनी जाणून घ्या या 5 गोष्टी

अलिकडे भारतात लिव्ह-इन रिलेशनशिपचा ट्रेन्ड अधिक वाढलेेला बघायला मिळतोय. लिव-इनमध्ये राहणारे काही कपल्स एकमेकांबाबत सिरीअस होतात, पण काही केवळ टाईमपास म्हणून हे सगळं करत बसतात. असे लोक दोघांच्या भविष्याचा विचार न करता केवळ आपल्या गरजा भागवण्यासाठी एकमेकांसोबत राहतात. पण जर तुम्ही एक मुलगी आहात आणि तुम्ही लिव्ह-इनमध्ये राहण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे ठरेल. जेणेकरुन तुम्हाला मोठ्या अडचणीला तोंड द्यावं लागणार नाही.  

1) आधी चांगले मित्र बना

जर तुम्ही तुमच्या पार्टनरला काही दिवसांपूर्वी भेटल्या आहात आणि तरीही तुम्ही लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला असेल तर सर्वातआधी तुमच्या पार्टनरचा स्वभाव जाणून घ्या. त्याचा स्वभाव जाणून घेतल्यानंतर आणि तो समजल्यानंतरच निर्णय घ्या. जर तुम्हाला जराही शंका आली तर तुम्ही निर्णय बदलू शकता. 

2) पैशांचं मॅनेजमेंट

अर्थातच लिव्ह-इनमध्ये राहणारे दोन लोक हे पती-पत्नी नाहीत. त्यामुळे पैसे केवळ मुलानेच खर्च करावे असं काही धरलं-बांधलं नसतं. जर तुम्हाला वाटतं की, पैशांमुळे पुढे समस्या निर्माण होऊ शकतात. तर त्या समस्या निर्माण होण्याआधीच त्याबाबत चर्चा करा. कोण किती खर्च करणार, कोण किती सेव्हिंग करणार हे आधीच क्लिअर करा.  

3) स्वत:च्या मनाची तयारी करा

लिव्ह-इनमध्ये राहणार असाल तर तुमचं लाईफ पूर्णपणे बदलणार असतं. आधीसारखं काही राहणार नाही. त्यामुळे या नव्या नात्यासाठी स्वत:च्या मनाची भावनिक आणि मानसिक तयारी करुन घ्या. मुलांचं लाइफस्टाईल वेगळं असतं. त्यांच्या काही सवयी तुम्हाला पसंत येणार नाहीत. पण त्यांच्या गोष्टी स्विकारण्याची मानसिक तयारी करा. 

4) रागावर कंट्रोल

लग्नानंतर एकमेकांची लाइफस्टाईलचा सहज स्वीकार न केल्याने पती-पत्नीमध्ये अनेकदा छोटी छोटी भांडणे होत असतात. लिव्ह-इनमध्येही हीच समस्या येते. अशावेळी भांडणं अधिक टोकाला जाऊ नये यासाठी रागावर कंट्रोल करणं यायला हवं. 

5) लिव्ह-इन एक प्रयोग

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या कपल्सला हे माहीत असतं की, ते एक प्रयोग करत आहेत. एकमेकांना जर समजून घेऊ शकले आणि ते त्यांना जाणवलं तर सोबत जीवन घालवायचं आहे. काही कपल्सना हे जमतं आणि ते लग्न करतात. पण तुमची मतं, विचार जुळली नाहीतर ते वेगळे होतात. पण इथेच मुली अनेकदा कमी पडताना दिसतात. जर तुम्हाला असं वाटलं की, तुमचा पार्टनर एक चांगला जीवनसाठी होऊ शकत नाही, तर लगेच या नात्यातून बाहेर येण्यासाठी तुम्ही पाऊल उचला.
 

Web Title: Things girls must know about live in relationships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.