सासूबाईंची आदर्श सून व्हायचयं?; तर 'या' गोष्टी कधीच ऐकवू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 01:31 PM2019-05-10T13:31:11+5:302019-05-10T13:33:47+5:30
सासू-सुन म्हणजे, एकमेकींच्या पक्क्या वैरीणी असं गमतीने म्हटलं जातं. प्रत्येक घरात सासू-सुनेची भांडणं किंवा त्यांचं एकमेकींवर असलेलं प्रेम पाहायला मिळतं.
सासू-सुन म्हणजे, एकमेकींच्या पक्क्या वैरीणी असं गमतीने म्हटलं जातं. प्रत्येक घरात सासू-सुनेची भांडणं किंवा त्यांचं एकमेकींवर असलेलं प्रेम पाहायला मिळतं. तसं पाहायला गेलं तर एका व्यक्तीवर प्रेम करणाऱ्या या दोघी एकमेकींच्या अगदी कट्टर दुश्मन असल्याप्रमाणे वागतात. आपण अनेकदा सासू-सुनांचे व्हायरल झालेले जोक्स वाचत असतो. पण यामध्ये आपण हे विसरतो की, आयुष्यात या दोन्ही भूमिका कधीना कधी प्रत्येक स्त्रीला साकाराव्या लागतात. कारण आजची सून ही उद्याची सासु असतेच की, पण तरिसुध्दा या दोघी एकमेकींशी मात्र फार अंतर ठेवून वागतात.
जेव्हा गोष्ट सासू-सुनेच्या नात्याबाबत असते, त्यावेळी अनेक लोक टिव्हीवर येणाऱ्या सिरीयल्सचा विचार करतात. त्यांना असंचं वाटतं की, प्रत्येक सासू-सुनेच्या नात्यामध्ये भांडणंचं असतात. परंतु काही नाती याला अपवाद असतात. जेव्हा एखादी मुलगी लग्नानंतर सासरी जाते. त्यावेळी तिला तिच्या जोडीदारासोबतच घरातील इतर लोकांशीही नातं तयार करावं लागतं. खासकरून तिच्या सासुसोबत एक खास नातं तयार करावं लागतं. अशातच तुम्हीही या नात्याची सुरुवात करणार असाल आणि तुम्हाला सासूसोबत भांडण न करता एक गोड नातं तयार करायचं असेल तर, तुम्हालाही काही गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. आज आम्ही अशाच काही टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या दोघींच्या नात्यामधील भांडणं टाळू शकता.
तुमची सासू म्हणजे, तुमच्या जोडीदाराची आई असते. त्यामुळे तुम्ही तिच्याशी आदराने वागावं अशी तुमच्या पतीचीही इच्छा असतेच. त्यामुळे तुम्ही त्यांच्यासमोर काही गोष्टी बोलणं टाळणं गरजेचं आहे. जाणून घेऊया त्या गोष्टींबाबत...
1. मी तुमच्या मुलाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखते
आपल्या सासूला ऐकवण्यात येणारी सर्वात वाईट गोष्टींपैकी एक गोष्ट म्हणजे, तुमच्या जोडीदाराची आई आहे. त्यामुळे तिच्या सुनेने तिला हे सांगितलेलं अजिबात आवडणार नाही की, मी तुमच्या मुलाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखते. तुम्ही जर सारखं असं त्यांना ऐकवलतं तर त्यांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक व्यक्तीची एक जागा असते. त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात त्यांच्या आईची आणि त्यांच्या पत्नीची जागा वेगवेगळी आहे.
2. माझ्या वैवाहिक आयुष्यात तुम्ही लुडबुड करू नका
जर तुमची सासू तुम्हाला एखादा सल्ला देत असेल तर, तुम्ही त्या सांगत असलेली गोष्ट ऐकून घ्या. तुम्हाला ती गोष्ट पटत असेल किंवा नसेल निदान एक मोठी व्यक्ती म्हणून तुम्ही ती गोष्ट ऐकून घेऊ शकता. परंतु त्यांना असं कधीही म्हणू नका की, आमच्या वैवाहिक आयुष्यात लुडबुड करू नका. ती एक आई आहे आणि ती आपल्या मुलाचं चांगलं होण्यासाठी प्रयत्न करत राहणार. त्यांचा सल्ला घेणं कदाचित तुमच्यासाठीही फायदेशीर ठरू शकतं. परंतु, त्यांना सरळ तुम्ही लुडबुड करताय असं म्हणणं चुकीचं आहे.
3. मी माझ्या मुलांना स्वतः सांभाळू शकते
तुम्हाला तुमच्या मुलांचा तुम्हाला वाटतं तसा सांभाळ करण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, तुमचं मुल हे तुमच्या सासूबाईंचा नातू किंवा नात आहे. त्यांचंही मुलांवर तेवढचं प्रेम असतं जेवढं तुमचं असतं. तसेच तुमच्याएवढीच काळजी त्यांनाही असते. मुलांचा सांभाळ करताना कधी त्यांच्याकडून घेतलेले सल्ले तुम्हाला मदत करतील.
4. माझी आई तुमच्यापेक्षा उत्तम स्वयंपाक करते
असं होऊ शकतं की, तुमची आई उत्तम स्वयंपक करत असेल आणि ती चांगलं जेवण तयर करत असेल. परंतु तुमच्या सासूबाईंनी केलेल्या स्वयंपाकाची आणि आईच्या स्वयंपाकाची अजिबात तुलना करू नका. खासकरून सासूबाईंना तर अशा गोष्टी कधीच ऐकवू नका. असं म्हटल्याने तुमच्या नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो.
टिप : वरील गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.