पहिली डेट झाली असेल चांगली तर दुसऱ्या डेटची अशी करा तयारी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2018 02:35 PM2018-06-08T14:35:45+5:302018-06-08T14:35:45+5:30
तेव्हाच तुमच्या नात्याला नवीन वळण मिळेल. चला जाणून घेऊया सेकंड डेटसाठी काय तयारी करावी लागले.
(Image Credit: www.huffingtonpost.co.uk)
मुंबई : पहिल्या डेटवर जाण्याआधी मुलगा आणि मुलगी दोघांच्याही मनात अनेक प्रश्न सुरु असतात. एक भीतीही वाटत असल्याने पहिल्या डेटमध्ये काही गोष्टी बोलायच्या राहून जातात आणि दुसऱ्यांदा भेटण्याची संधी मिळत नाही. पण जर तुमची पहिली डेट चांगली झाली असेल आणि दुसऱ्यांदाही भेटणार असाल तर दुसऱ्या डेटसाठीही काही तयारी करणे गरजेचे असते. सेकंड डेटला तुम्ही त्या व्यक्तीशी काय बोलायचंय याची तयारी करायला हवी. तेव्हाच तुमच्या नात्याला नवीन वळण मिळेल. चला जाणून घेऊया सेकंड डेटसाठी काय तयारी करावी लागले.
कशी सुरु आहे लाईफ?
पहिल्या डेटमध्ये नक्कीच तुम्ही त्या व्यक्तीच्या महत्वाच्या गोष्टींबाबत त्याला/तिला विचारलं असेल, दैनंदिन कामकाजाबाबत विचारलं असेल. पण आता त्या व्यक्तीला लाइफ कशी सुरु आहे? असा प्रश्न करा. याने तुम्हाला त्या व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत आणखी काही खास गोष्टी जाणून घेता येईल.
पुढचा प्लॅन
प्रोफेशनल असो वा खाजगी पुढे काय करायचं आहे याबाबत यावेळी विचारायला हवं. पुढील 5 किंवा 10 वर्षात तो/ती काय करणार आहे याबाबत विचारा.
जे करत आहे त्यात खूश आहे का?
बहुतेकजण हे आपला सर्वात जास्त वेळ ऑफिसमध्ये घालवतात. त्यामुळे त्यांना विचारा की, काय ते त्यांच्या नोकरीतून किंवा बिझनेस करुन खूश आहेत का? काय ते समाधानी आहेत? त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवायचा प्लॅन करण्याआधी हे जाणून घेणे फार गरजेचे आहे.
आयुष्यातील खास लक्षात राहिलेला क्षण
त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यातील खास लक्षात राहिलेल्या क्षणांबाबत विचारा. अशा प्रकारे काही गोष्टी केल्यास तुमच्यातील संवाद चांगल्याप्रकारे पुढे जाऊ शकतो.
आधीच्या डेटच्या गोष्टी
तुम्ही आधीच्या डेटमध्ये कोणत्या गोष्टी केल्या याचाही पुर्नरुच्चार करा. किंवा पहिल्या डेटमध्ये काही विचारायचं राहून गेलं असेल ते दुसऱ्या डेटमध्ये विचारा.
तुम्हाला काय वाटलं तेही सांगा
पहिल्या भेटीत तुम्हाला त्या व्यक्तीची कोणती गोष्ट आवडली तेही सांगा. पण ते सांगण्याचीही पद्धत व्यवस्थित असावी. त्या सांगण्यातून त्या व्यक्तीला हे कळू देऊ नका की, तुम्ही त्यांच्याबाबत सिरीअस आहात.
त्यालाही विचारा भेटून कसं वाटलं?
कोणताही संकोच न करता त्यांना विचारा की, तुम्हाला मला भेटून कसं वाटलं. तो तुमच्याबद्दल काय विचार करतो किंवा करते, याबाबत जरा फिरकी घेऊन प्रश्न विचारा. आणि जेव्हा या प्रश्नाचं उत्तर मिळत असताना त्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे आणि बॉडी लॅंग्वेजवर लक्ष द्या. अनेकदा काही लोक केवळ इम्प्रेस करण्यासाठी खोटंही बोलतात. अशावेळी तुम्ही जरा सावध राहायला हवं.