मुलांचे लुक्स आणि बॉडी नाही, तर 'या' गोष्टी नोटीस करून मुली देतात होकार...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 12:23 PM2020-01-12T12:23:49+5:302020-01-12T12:26:39+5:30

अनेकदा सिंगल असलेली मुलं रिलेशनशीपमध्ये राहण्याचा विचार करत असतात.

Things which girls notice first in boys in relationship | मुलांचे लुक्स आणि बॉडी नाही, तर 'या' गोष्टी नोटीस करून मुली देतात होकार...

मुलांचे लुक्स आणि बॉडी नाही, तर 'या' गोष्टी नोटीस करून मुली देतात होकार...

Next

(Image credit-India.com)

अनेकदा सिंगल असलेली मुलं रिलेशनशीपमध्ये राहण्याचा विचार करत असतात. कारण एकटं राहून त्यांना कंटाळा आलेला असतो किंवा त्यांना भावना समजू घेत असलेल्या व्यक्तीची गरज असते. त्यासाठी मुलींना आकर्षीत कसं करता येईल याकडे मुलं अधिक लक्ष देत असतात. भरपूर मुलांना असं वाटतं असतं की आपण आपल्या लुक्स आणि चांगल्या बॉडीने महिलांना आकर्षित करू शकतो पण एक्सपर्टसच्यामते  असा विचार करणं पूर्णपणे योग्य नाही. कारण बॉडी आणि लुक्स सोडता इतर अनेक गोष्टी मुली मुलांमध्ये निरीक्षण करत असतात. चला तर मग  जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत. ज्या मुलीं  मुलांमध्ये नोटीस करतात. 

Image result for boys impressing to girl
(image credit- floweraura)

फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन' 

Image result for boys impressing to girl(image credit- lovepanky)

जर तुम्ही कोणत्याही मुलीला पहिल्यांदा भेटत असाल तर तुमचा पहिला लूक खूप महत्वाचा असतो. त्यावेळी तुमचे शूज आणि कपडे नीटनेटके ठेवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला चांगल्याप्रकारे कसं प्रेजेंन्ट करता येईल याचा प्रयत्न करा. तुमच्या दिसण्याबरोबरच तुम्ही कसे कपडे किंवा शूज घातले आहेत. या गोष्टींचा प्रभाव मुलींवर पडत असतो. 

ड्रेसिंग

Related image(image credit-glamouefame.com)

कोणत्याही मुलींला पहिल्यांदा भेटायला जात असतान तुम्ही स्वतःच्या ड्रेसिंगकडे अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.   कारण  जर कोणताही मुलगा डार्क रंगाचं शर्ट घालून गेला तर त्याचा स्वभाव बिंधास्त असल्याचं दिसून येतं. तर तुम्ही तुमच्या आयुष्याकडे गंभीर दृष्टीकोनातून पाहत नाही असा त्याचा अर्थ होऊ शकतो.  सर्वाधिक मुली या डिसेंन्ट ड्रेस तसंच सौम्य असे लाईट रंगाचे कपडे घातल्यास आकर्षीत  होतात. 

हसण्यातून तुमची पर्सनॅलिटी दिसून येते.

Image result for boys impressing to girl(image credit- zoosk)

मानसशास्त्रिय दृष्टीकोनातून पाहिल्यास  मुलांचे हास्य त्यांच्या पर्सनॅलिटीबद्दल खूप काही सांगून जात असतं.  जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त हसलात तर तुम्ही ओवर कॉन्फिडन्ट आहात असा सुध्दा त्याचा अर्थ असू शकतो.  काही मुलांना  स्वतःच्या काही गोष्टी लपवण्यासाठी खूप हसण्याची सवय असते.

हेअर स्टाईल

Image result for boys impressing to girl(image credit- menwit)

अनेकांना असं वाटतं असतं की मुली त्यांच्या हेअरस्टाईलकडे लक्ष देत नाही.   तुम्ही आकर्षक  दिसण्यात हेइरस्टाईलचा खूप मोठा वाटा असतो. त्यामुळे तुम्ही  चेहरा आणि  डोक्याला सुट करेल असा हेअरकट करा. सध्याच्या काळातल्या मुलींना केसांवर वेगवेगळे  प्रयोग करून केसांची स्टाईल करणारे मुलं आवडतात.  तसंच तुमच्या नखांकडे सुध्दा मुलींचं लक्ष असतं जर तुमची नखं जास्त वाढलेली असतील  किेंवा त्यात जास्त  घाण जमा झालेली असेल तर तुमचा नकारात्मक प्रभाव पडून तुम्ही अस्वच्छ राहता असा सुध्दा मुलींचा समज होऊ शकतो. 

बोलण्याची पध्दत 

Image result for boys impressing to girl(image credit-cupid)

मुलींशी बोलताना तुमचा आवाज खूप मोठा असेल तर तुमचा चांगला प्रभाव पडत नाही. जर तुम्ही पहिल्यांदा बोलत असाल तर लहान आवाजत बोलण्याचा प्रयत्न करा.  आवाजात जास्त एटिट्यूट आहे असं मुलींना वाटता कामा नये. जी मुलं सोम्य आवाजात बोलत असतात. ती मुलं खूप कमी वेळात मुलींच्या मनात जागा निर्माण करतात.

Web Title: Things which girls notice first in boys in relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.