'या' गोष्टींमध्ये दडलंय हॅपी मॅरिड लाइफचं गुपित!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2018 04:41 PM2018-10-11T16:41:00+5:302018-10-11T16:43:12+5:30
नवरा बायकोचं नातं हे फार घट्ट आहे, परंतु काही गोष्टींबाबत हा समज खोटाही ठरतो. हे नातं जर वेळीच सावरलं नाही तर मात्र गोष्टी हाताबाहेर जाऊन त्याचा परिणाम नात्यावरही होऊ शकतो.
नवरा बायकोचं नातं हे फार घट्ट आहे, परंतु काही गोष्टींबाबत हा समज खोटाही ठरतो. हे नातं जर वेळीच सावरलं नाही तर मात्र गोष्टी हाताबाहेर जाऊन त्याचा परिणाम नात्यावरही होऊ शकतो. जर समजुतदारपणाने काही गोष्टी हाताळल्या तर तुमच्या नात्यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाही. जाणून घेऊयात अशा काही 4 गोष्टी ज्या तुमचं नातं टिकवून ठेवण्यासाठी तुम्हाला मदत करतील.
एकमेकांना पर्सनल स्पेस द्या
नात्यामध्ये दोघांनीही एकमेकांना पर्सनल स्पेस देणं गरजेचं असतं. अन्यथा नात्यामध्ये प्रॉब्लेम्स होऊ शकतात. एकमेकांना पर्सनल स्पेस दिल्यामुळे नात्यामध्ये विश्वास वाढतो.
प्रेमच सगळ नसतं
जर तुम्हाला वाटत असेल की, प्रेमच सगळं आहे तर हा तुमचा गैरसमज आहे. प्रेम म्हणजे एकमेकांवर विश्वास ठेवणं आणि एकमेकांचा रिस्पेक्ट करणं असतं. ही गोष्ट लक्षात ठेवून एकमेकांशी वागलात तर तुम्हाला आनंदी राहण्यास मदत होईल.
अॅडजस्टमेंट करणं फायदेशीर
नातं म्हटलं की, अॅडजस्टमेंट आलीच. तुम्हाला तुमचं नातं टिकवू ठेवण्यासाठी कुठे ना कुठेतरी अॅडजस्टमेंट करणं गरजेचं असतं. अनेकजण अॅडजस्टमेंट करणं म्हणजे स्वतःचा कमीपणा समजतात. असं न करता तुम्ही गोष्ट समजून त्याबाबत व्यवस्थित विचार करणं गरजेचं असतं.
नात्यांमध्ये व्यवहार आणू नये
नात्यांमध्ये व्यवहार आला की नात्याचा पाया खचतो. कारण नातं हे विश्वासावर आणि आपुलकीवर उभं असतं. तुमच्या व्यवहाराच्या गोष्टी एकमेकांना माहिती असणं गरजेचं असतं. कोणतीही गोष्ट कोणापासूनही लपवून ठेवता कामा नये.