नवीन वर्षात पार्टनरशी भांडण होऊ नये म्हणून वापरा 'या' खास टीप्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2020 01:03 PM2020-01-01T13:03:55+5:302020-01-01T13:09:36+5:30

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर प्रत्येकालाच आपल्या पार्टनरशी असलेले नातं अधिकाधिक चांगलं होत जावं असं वाटतं असतं.  

Tips for good relationship of couples in the New Year | नवीन वर्षात पार्टनरशी भांडण होऊ नये म्हणून वापरा 'या' खास टीप्स...

नवीन वर्षात पार्टनरशी भांडण होऊ नये म्हणून वापरा 'या' खास टीप्स...

Next

नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर प्रत्येकालाच आपल्या पार्टनरशी असलेले नातं अधिकाधिक चांगलं होत जावं असं वाटतं असतं.  कारण नातं कोणतंही असो त्यात खटके उडणं हे स्वाभाविक आहे. दैनंदिन आयुष्य जगत असताना अनेकदा  भांडणं होतातचं त्यातून भांडण टोकाला सुद्धा जाऊ शकतं आणि नातं तुटण्यची शक्यता असते. ही वेळ टाळण्यासाठी वर्षाच्या सुरूवातीलाच तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे. ज्यामुळे तुम्ही संपूर्ण वर्ष तुमच्या पार्टनरसोबत आनंदाने घालवाल.


नात्याचं महत्व ओळखा

आपल्या आयष्यात एखाद्या व्यक्तीचे असलेलं स्थान आणि आपण त्या व्यक्तीची निवड का केली या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. अनेकदा असे प्रसंग येतात ज्यावेळी तुमची चूक असून सुद्दा अहंकाराची भावना ठेवली जाते. असं केल्याने नातं टिकवण्यास अवघड होऊन बसतं. त्यामुळे जर एखाद्यावेळी तुमची चुक असेल तर ती मान्य करा. त्यामुळे होणारे वाद टळू शकतात.

तडकाफडकी निर्णय घेणे टाळा

कोणतेही लहान- मोठं भांडण झाले असेल तर रागाच्या भरात निर्णय घेण्याची घाई करू नका. कारण यामुळे तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. 

 भीती ठेवू नका

अनेक लोकांना भीती  वाटत असते की आपलं चांगलं चालत  असलेले रिलेशनशीप कधीही  तुटेल. शक्यतो तुम्ही अशी भीती बाळगू नका कारण याचा वाईट परीणाम तुमच्या मानसीक आरोग्यावर होण्याची शक्यता असते. त्यामुळे एकमेकांना समजून घेत नातं टिकवा.

संशय घेणं टाळा

तुमचा पार्टनर तुमच्यावर सतत संशय घेत असेल आणि कोणत्याही गोष्टीवर प्रश्न विचारत असेल तर समजून जा की त्याचा तुमच्यावर अजिबात विश्वास नाही. या परिस्थितीत तुम्ही पार्टनरला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करा. यानंतरही तुमच्यात या गोष्टीवरून वाद होत असतील  संयम ठेवून योग्य तो निर्णय घ्या.

खोटं  बोलणं टाळा  

नवीन वर्षाच्या सुरूवातीपासूनच पार्टनरशी खोटं बोलणं टाळा. नात्यात प्रामाणिकपणा  असणं आवश्यक आहे. जर तुम्ही एकमेकांसाठी निष्ठावान असाल तर कितीही कठीण प्रसंग आलं तर तुमचं नातं कधीच तुटू शकत नाही. मात्र तुमचा पार्टनर तुमच्याशिवाय दुसऱ्यासोबत भविष्याची स्वप्न रंगवत असेल तर तुमचं नातं संपुष्टात आलंय असं समजावं.

Web Title: Tips for good relationship of couples in the New Year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.