रिलेशनशिप कंटाळवाणं होऊ नये म्हणून विवाहित कपल्सने फॉलो करा या टिप्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:00 AM2023-11-25T11:00:54+5:302023-11-25T11:01:41+5:30
Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये एकमेकांसाठी वेळ कमी असल्याने लोक निराश असतात आणि अशात तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस सहन करावा लागतो.
Relationship Tips : आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोक कामासाठी सकाळी घरातून बाहेर पडतात आणि थेट रात्री उशीरा घरी परत येतात. ही लाइफस्टाईल आज कॉमन झाली आहे. या लाइफस्टाईलमुळे लोकांच्या रिलेशनशिप आणि वैवाहिक जीवनावरही वाईट प्रभाव पडत आहे. अनेकदा लोक काम आणि कामाच्या टेंशनमुळे जोडीदाराला अंटेशन देऊ शकत नाहीत. ज्याची त्यांना गरज असते. अडचण ही आहे की, अनेक तास काम करून घरी आल्यावर त्यांच्याकडे जोडीदारासाठी वेळच नसतो.
रिलेशनशिपमध्ये एकमेकांसाठी वेळ कमी असल्याने लोक निराश असतात आणि अशात तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस सहन करावा लागतो. अशात आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुमचं रिलेशनशिप आणि वैवाहिक जीवनातील आनंद कायम ठेवू शकता.
प्रेम कसं कायम ठेवाल
कामाचा भरपूर लोड असूनही अशा अनेक पद्धती आहेत ज्यांद्वारे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कनेक्टेड राहू शकता. गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ जोडीदारासाठी काढावा. यादरम्यान फोन दूर ठेवा आणि एकमेकांवर फोकस करा.
या गोष्टी न विसरता करा - भलेही तुम्ही दिवसभर बिझी असता, पण गरजेचं आहे की, तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही गोष्टी रोज फॉलो केल्या पाहिजे. जसे की, सकाळी सोबत चहा घेणं किंवा वॉक करणं. सोबत जेवण करणं. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला पुन्हा जवळ आणतात.
टेक्नॉलॉजीपासून दूर रहा - तुम्हाला तुमच्या जोडीदाराला भेटण्यासाठी कितीही वेळ लागू द्या, पण या दरम्यान मोबाइल, टीव्ही किंवा लॅपटॉप अशा गोष्टी दूर ठेवा. सोबतच हेही गरजेचं आहे की, तुम्ही जोडीदारासोबत असताना शरीराने आणि मनाने त्यांच्यासोबत असावं.
छोटा ब्रेक - रिलेशनशिपमध्ये गरजेचं आहे की, तुम्ही जोडीदारासोबत फिरण्यासाठी थोडा वेळ काढावा. वीकेंड किंवा लॉंग वीकेंड छोट्या ट्रीपचा प्लान करू शकता. याने तुमच्यातील दुरावा कमी होईल.
झोपण्याआधी बोला - रात्री झोपण्याआधी एकमेकांसोबत बोला. एकमेकांना सांगा की, तुमचा दिवस कसा गेला आणि तुमच्यासोबत दिवसभर काय झालं.