नातं मजबूत ठेवायचं असेल तर करु नका या चुका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 05:34 PM2018-08-16T17:34:01+5:302018-08-16T17:35:22+5:30
रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा विचार आणि गरज वेगळी असते. नात्यात असताना आपण अनेकदा अशाकाही गोष्टी करतो ज्याकारणाने वाद इतके टोकाला जातात की, जीवनातील आनंदच दूर होतो.
(Image Credit : www.businessinsider.in)
रिलेशनशिपबाबत प्रत्येकाचा विचार आणि गरज वेगळी असते. नात्यात असताना आपण अनेकदा अशाकाही गोष्टी करतो ज्याकारणाने वाद इतके टोकाला जातात की, जीवनातील आनंदच दूर होतो. पण हे असं होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली तर फायदा होऊ शकतो. खालील काही चुका टाळल्या तर तुमचं नातं आणखी फुलू शकतं.
रिलेशनशिपमधून काय हवंय?
सर्वातआधी तर तुम्हाला या नात्यातून काय हवंय हे क्लिअर करायला हवं. जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये डेटींगमध्येच हे स्पष्ट होतं की, तरुण-तरुणी कपल होणार की नाही. जर तुम्हाला वाटत असेल की, डेटला तुम्ही पार्टनर नाही करु शकत तर जबरदस्तीने ते नातं लांबवण्याची गरज नाहीये. कारण याचा त्रास दोघांनाही होतो.
शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती नसावी
काहींच्या नात्या सेक्स इमोशन्स इतकाच महत्वाचा बनतो. पण हेही विसरू नये की, फिजिकल रिलेशन हे जबरदस्तीने ठेवू नये. दोघांचीही इच्छा असेल तरच यात पडावं. कारण जबरदस्तीने यात पडाल तर तुम्हाला स्ट्रेसशिवाय काही मिळणार नाही. सोबतच तुमच्या नात्याची विश्वासार्हताही कमी होईल.
विनाकारण अपेक्षा
अपेक्षा असणं चांगली गोष्ट आहे. पण वाईट गोष्टींची किंवा नको त्या गोष्टींच्या अपेक्षा ठेवल्या तर नातं तुटू शकतं. म्हणजे दोघांना एकमेकांच्या गोष्टी माहीत असाव्यात. पण त्याची बळजबरी असू नये. हेच का नाही सांगितलं तेच का नाही सांगितलं हे नसावं. जे आहे ते स्पष्ट असावं उगाच खोट्या अपेक्षा ठेवून तुम्ही त्रास करुन घेऊ शकता.
चुकीच्या व्यक्तीला दूर करा
अनेकदा खूप वेळाने काही लोकांना याची जाणिव होते की, त्यांचा पार्टनर त्यांच्यासाठी योग्य नाहीये. जर तुम्ही या नात्यामुळे स्ट्रेसमध्ये असाल आणि अजिबात आनंदी नसाल तर हे नातं तिथेच थांबवलेलं योग्य ठरेल. वेळीच योग्य तो निर्णय घेऊन मोकळे व्हा.