गॅजेट्सपेक्षा परंपरागत खेळण्यांमुळे लहान मुलांमध्ये वाढतो समजूतदारपणा! - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:10 AM2018-12-20T11:10:21+5:302018-12-20T11:19:47+5:30

लहान मुला-मुलींमध्ये एखादी गोष्ट जाणून घेण्याची आणि समजण्याची क्षमता वाढवायची असेल तर त्यांच्यासोबत ब्लॉक आणि पझल गेम खेळावे.

Traditional toys and games are better for toddlers than high tech gadget | गॅजेट्सपेक्षा परंपरागत खेळण्यांमुळे लहान मुलांमध्ये वाढतो समजूतदारपणा! - रिसर्च

गॅजेट्सपेक्षा परंपरागत खेळण्यांमुळे लहान मुलांमध्ये वाढतो समजूतदारपणा! - रिसर्च

Next

लहान मुला-मुलींमध्ये एखादी गोष्ट जाणून घेण्याची आणि समजण्याची क्षमता वाढवायची असेल तर त्यांच्यासोबत ब्लॉक आणि पझल गेम खेळावे. त्यांना गॅजेट्सपासून दूर ठेवावे. अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चमध्ये हे सांगण्यात आलं आहे. यात सांगण्यात आलं आहे की, लहान मुलांसाठी परंपरागत खेळच चांगले ठरतात. यादरम्यान लहान मुलं आई-वडिलांसोबत जास्त आनंदी राहतात. 

या शोधाशी संबंधित डॉ. एलन मेंडलसन म्हणाले की, पाच वर्षांपर्यंत लहान मुलांसाठी कार्ड बोर्डचा वापर एका खेळासारखा केला जाऊ शकतो. हे घरीही सहजपणे तयार केलं जाऊ शकतं. पण अनेक पालक हे वेगवेगळ्या जाहिरातींना भाळून त्यावर विश्वास ठेवू लागतात. त्यांना वाटतं की, प्रॉडक्ट लहान मुलांचं ज्ञान वाढवण्यात आणि मेंदूची क्षमता वाढवण्याचं काम करतात. पण असं नाहीये. पालकांचा हा सर्वात मोठा गैरसमज आहे की, महागड्या खेळण्यांमुळे लहान मुलांची विचार करण्याची आणि समजण्याची क्षमता वाढते. डॉ.एलन यांच्यानुसार, जेव्हा लहान मुलं आणि पालक एकत्र खेळणी खेळतात, तेव्हा लहान मुलांच्या विकासात सकारात्मक बदल बघायला मिळतो. 

(Image Crdit : www.express.co.uk)

'या' सवयींमुळे वाढतं वजन

शोधानुसार, लहान मुलांची इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सबाबतची ओढ वाढल्याने त्यांना बोलणे आणि भाषेच्या विकासासाठी अडसर निर्माण होऊ शकतो. त्यासोबतच या गॅजेट्समुळे लहान मुलांचं वजन वाढण्याचीही शक्यता असते. या शोधात आढळलं की, अमेरिकेतील साधारण ९० टक्के लहान मुलं-मुली १ वर्षांचे झाल्यापासूनच मोबाइल फोनचा वापर करणे सुरु करतात. 

(Image Credit : childrenandnature.org)

बालरोग तज्ज्ञांनुसार, साधारण २ वय वर्षांपर्यंत लहान मुलां-मुलींचा मोबाइल किंवा टॅबलेट स्क्रीनसोबत संपर्क येऊ नये. लहान वयातील मुला-मुलींनी दिवसभरात टीव्ही किंवा कम्प्युटर स्क्रीनसमोर १ तासांपेक्षा जास्त वेळ घालवू नये. कारण त्यांना इलेक्ट्रॉनिक गॅजेटची सवय लागली तर त्यांना कंट्रोल करण्यास अडचण येते. लहान मुलांसाठी बॉल, पझल, चित्रांमध्ये रंग भरणे आणि कार्ड गेम्स चांगले फायदेशीर ठरतात.

मुलांच्या वागण्यात बदल

एका महिला लेह ग्राहम स्टीवर्ट हे समजून घेण्यासाठी एका अशा स्टोरमध्ये गेली जिथे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स विकले जात नाहीत. या महिनेनुसार, स्टोरमध्ये असलेली दोन लहान मुलं आयपॅडवर गेम खेळल्यानंतर फार चुकीचा व्यवहार करत होते आणि त्यामुळे स्टोरमधील लोकांनी मुलांना बाहेर जाऊ खेळण्यास सांगितले. स्टोरची मालक एरिकानुसार, आमचं लक्ष लहान मुला-मुलींना टेक्नॉलॉजीशी निगडीत खेळण्यांचा पर्याय उपलब्ध करुन देणे हा आहे. 

हा रिसर्च अमेरिकेत जरी करण्यात आला असला तरी याचा प्रभाव भारतातच नाही तर जगभरातील देशांमध्ये बघायला मिळतो. बदलत्या लाइफस्टाइलमुळे लहान मुलांच्या विकासाच्या गोष्टींमध्येही बदल बघायला मिळत आहेत. भारतातही लहान मुलांना गॅजेट्सची सवय लागण्याची समस्या डोकं वर काढत आहे. अशात त्यांना यातून बाहेर काढण्यासाठी पालकांची जबाबदारी अधिक वाढते. 

Web Title: Traditional toys and games are better for toddlers than high tech gadget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.