TREND : आता पायानेही काढा सेल्फी !
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2017 01:11 PM2017-02-05T13:11:47+5:302017-02-05T18:41:47+5:30
सेल्फीची वाढती क्रेझ पाहता त्यात नवनवीन बदल करुन सेल्फी पे्रमींना एक आनंदाची पर्वणीच दिली जाते. आतापर्यंत आपण फक्त हातानेच सेल्फी काढत होतो. मात्र आता चक्क पायानेही सेल्फी काढण्याची सुविधा एका कंपनीने देत धमाल उडवून दिली आहे.
Next
सेल्फीची वाढती क्रेझ पाहता त्यात नवनवीन बदल करुन सेल्फी पे्रमींना एक आनंदाची पर्वणीच दिली जाते. आतापर्यंत आपण फक्त हातानेच सेल्फी काढत होतो. मात्र आता चक्क पायानेही सेल्फी काढण्याची सुविधा एका कंपनीने देत धमाल उडवून दिली आहे.
सेल्फी काढतांना एका हाताचा आपण वापर करतो यासाठी बाजारपेठेत सेल्फी स्टीक्स, सेल्फी ड्रोन्स आदी उपलब्ध आहेत. मात्र आपण आता पायानेही सेल्फी काढू शकणार आहोत. ‘किकस्टार्टर’ या क्राऊडफंडींग जमा करणाऱ्या संकेतस्थळावर ‘सेल्फीफिट’ हा एक प्रोजेक्ट सादर करण्यात आला आहे. यात पायाच्या मदतीने सेल्फी काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. हा एक लहानसा पट्टा असून याच्या एका भागाला चुंबक लावण्यात आले आहे. हा पट्टा पावलाभोवती गुंडाळून त्यावर स्मार्टफोन अटॅच केला जातो. यानंतर ब्ल्यु-टुथ कनेक्टिव्हिटी असणाऱ्या रिमोट कंट्रोलच्या मदतीने सेल्फी घेता येतो. याचप्रमाणे अॅक्शन कॅमेऱ्यासाठी ‘कॅमेरा माऊंट’ म्हणूनही याचा वापर होऊ शकतो. अर्थात कुणीही ‘गोप्रो’ अथवा अन्य कॅमेऱ्याना याला अटॅच करून चित्रीकरण करू शकतो. तसेच कार माऊंट म्हणून आणि हातावर स्मार्टफोन अटॅच करण्यासाठीही याचा वापर होऊ शकतो. सेल्फीफिटचे अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींसाठी स्मार्टफोन अॅपदेखील आहे. सध्या कुणीही ‘किकस्टार्टर’वर २० डॉलर्स भरून याची अगावू नोंदणी करू शकेल. या ग्राहकांना हे उपकरण पहिल्यांदा मिळेल. येत्या काही महिन्यांत हे प्रॉडक्ट जागतिक बाजारपेठेत सादर होईल असे मानले जात आहे.