सिंगल महिलांना 'या' कंपनीमध्ये दिली जाते 'डेटिंग लिव्ह', जाणून घ्या कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 01:52 PM2019-01-23T13:52:25+5:302019-01-23T13:55:18+5:30
जर तुम्ही आजारी असाल किंवा काही घरातील काम असेल तर तुम्हाला तुमची कंपनी नक्कीच सुट्टी देईल.
जर तुम्ही आजारी असाल किंवा काही घरातील काम असेल तर तुम्हाला तुमची कंपनी नक्कीच सुट्टी देईल. त्यासोबतच तुमचं किंवा नातेवाईकातील कुणाचं लग्न असेल तरीही तुम्हाला सुट्टी मिळेल. पण कधी तुम्ही ऐकलंय का कुणाला डेटला जाण्यासाठी कंपनीने सुट्टी दिली म्हणून? तेही एक किंवा दोन दिवसांची नाही तर पूर्ण ७ दिवसांची.....
चीनमधील एक कंपनी असं करत आहे. चीनच्या जेहिआंग शहरातील दोन कंपन्या त्यांच्या ऑफिसमधील सिंगल महिलांना तब्बल ७ दिवासांची सुट्टी देत आहेत. ही सुट्टी त्यांना त्यांच्यासाठी पार्टनर शोधण्यासाठी आणि त्यांच्यासोबत डेट करण्यासाठी दिली जात आहे. ही सुट्टी त्यांना डेडिंग लिव्ह या नावाने दिली जाते.
काय आहे ही सुट्टी?
चीनच्या या दोन कंपन्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त महिला आहेत. या महिला दिवसभर डेस्कवर काम करतात आणि जास्त वेळेची ड्युटी करतात. त्यामुळे त्यांना ऑफिसमधून बाहेर जाण्याची संधीच मिळत नाही.
या महिलांमध्ये सिंगल महिलांच्या खाजगी गरज लक्षात घेऊन आणि समजून घेऊन कंपनीकडून त्यांना एकूण सात दिवसांची सुट्टी दिली जाते. जेणेकरुन यादरम्यान या महिला बाहेर निघाव्या आणि त्यांनी त्यांच्यासाठी जोडीदाराचा शोध घ्यावा. या दिवसात त्यांनी वेगवेगळ्या मुलांना भेटावं, त्यांना समजून घ्यावं आणि पर्सनल लाइफ आधीपेक्षा चांगली करावी हा उद्देश आहे.
शाळेतही मिळते लव लिव्ह
चीनच्या जेहिआंग शहरात केवळ या दोन कंपन्यांमध्येच नाही तर एका शाळेतील अशाप्रकारची सुट्टी दिली जाते. या शाळेतील सिंगल शिक्षिकांना महिन्यातून दोनदा अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळते. या अर्ध्या दिवसाच्या सुट्टीला लव लिव म्हणून ओळखले जाते. या सुट्टीत सिंगल शिक्षिकांना त्यांच्यासाठी जोडीदार शोधण्याची संधी दिली जाते.