सर्वात जास्त त्रासदायक असतं अशाप्रकारचं ब्रेकअप!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 02:04 PM2018-06-04T14:04:59+5:302018-06-04T14:04:59+5:30
काही ब्रेकअपमधून सहज बाहेर पडता येतं तर काहींमधून बाहेर पडणं कठीण होतं. सर्वात जास्त कशाप्रकारच्या ब्रेकअपमुळे त्रास होतो हे आपण बघुया.
कुणासाठीही ब्रेकअप हे सोपं नसतं. काहींसाठी ब्रेकअप पचवणं आणि त्यातून बाहेर पडणं फार अवघड असतं. ब्रेकअप होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. ब्रेकअपच्या वेगवेगळ्या पद्धतीही असतात. काही ब्रेकअपमधून सहज बाहेर पडता येतं तर काहींमधून बाहेर पडणं कठीण होतं. सर्वात जास्त कशाप्रकारच्या ब्रेकअपमुळे त्रास होतो हे आपण बघुया.
दुसऱ्या कुणासाठी पहिल्याला सोडणं
पर्सनॅलिटी अॅंड सोशल सायकॉलॉजी बुलेटिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसाठी आपल्या पार्टनरसोबत ब्रेकअप करणं सर्वात त्रासदायक ब्रेकअप असतं. याप्रकारच्या ब्रेकअपसाठी एक टर्मही तयार करण्यात आलीये त्याला कम्पॅरिटिव्ह रिजेक्शन असं म्हणतात.
जेव्हा नात्यांचं ओझं व्हायला लागतं
जेव्हा नातं भावनात्मक रुपाने ओझं वाटायला लागतं किंवा दोघांपैकी एक जेव्हा नात्यात इंटरेस्ट घेणं बंद करतं तेव्हा ब्रेकअप हाच मार्ग उरतो. कधी कधी काहींना एकमेकांना जास्त वेळ देण्यापेक्षा स्वत:ला अधिक वेळ द्यायचा असतो म्हणूनही ब्रेकअप करतात.
कम्पॅरिटिव्ह रिजेक्शन जास्त कठीण
जगभरात ब्रेकअपची जितकी कारणे आहेत त्यातील सर्वात जास्त त्रासदायक कारण हे कम्पॅरिटिव्ह रिजेक्शन असल्याचं बोललं जातं. ब्रेकअपच्या इतर कारणांमधून लोक लवकर बाहेर पडतात. पण या प्रकारच्या ब्रेकअपमधून बाहेर येणं त्यांना सर्वात कठीण जातं.
कोणतंही कारण नसताना ब्रेकअप
कम्पॅरिटिव्ह रिजेक्शननंतर दुसऱ्या नंबरवर असलेलं कारण म्हणजे कोणत्याही कारणाशिवाय झालेलं ब्रेकअप. जर एखाद्या व्यक्तीला त्याचं नातं का तुटलं याचं कारण माहीत नसेल तर या त्रासातून त्या व्यक्तीला बाहेर पडायला फार वेळ लागतो. अशाप्रकारच्या ब्रेकअपमध्ये पार्टनर केवळ अंदाज बांधत राहतात की त्यांचं ब्रेकअप का झालं असेल.
ही आहे ब्रेकअपची योग्य पद्धत
आपण सगळेच लहानपणापासूनच ऐकत असतो की, प्रामाणिकपणा हाच सर्वात चांगला गुण आहे. त्यामुळे हा गुण वापरुनच आपल्या पार्टनरसोबत खरं बोला.
आश्वासन द्या
जर तुमच्या ब्रेकअपचं कारण काही वेगळंच असेल तर पार्टनरला केवळ अंदाज बांधण्यासाठी तसंच सोडण्यापेक्षा त्याला याचा विश्वास द्या की तुमच्या लाईफमध्ये दुसरं कुणी नाही आणि एका वेगळ्याच कारणाने ब्रेकअप करतोय.