ऑफिसमध्ये 'या' शब्दांचा वापर बिघडवू शकते तुमची इमेज!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 04:37 PM2018-09-06T16:37:49+5:302018-09-06T17:28:32+5:30
नोकरी करताना कोणत्याही प्रकारचं अनप्रोफेशनल वागणं तुमच्यावर नेहमीसाठी ठपका लावू शकतं. चला जाणून घेऊ असे कोणते शब्द आहे जे बोलून तुम्ही स्वत:ची इमेज खराब करू शकता.
(Image Credit : www.ottawacitizen.com)
तुमच्या करिअरमध्ये तुमच्या बोलण्या-वागण्याला फार महत्त्व असतं. तुमच्या तोंडून निघालेला एखादा शब्द तुमच्या करिअऱवर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो. अनेकदा आपण असे काही बोलून जातो ज्याने दुसऱ्यांच्या नजरेत आपली प्रतिमा चुकीची तयार होते. नोकरी करताना कोणत्याही प्रकारचं अनप्रोफेशनल वागणं तुमच्यावर नेहमीसाठी ठपका लावू शकतं. चला जाणून घेऊ असे कोणते शब्द आहे जे बोलून तुम्ही स्वत:ची इमेज खराब करू शकता.
या शब्दांनी तयार होईल निगेटीव्ह एनर्जी
आपल्या रोजच्या लाइफमध्ये असे काही शब्द असतात जे प्रोफेशनल लाइफमध्ये जराही चांगले ठरवले जाऊ शकत नाही. 'अशक्य' किंवा 'नाही करु शकत' हे शब्द दुसऱ्यांसमोर तुमची नकारात्मक इमेज तयार करतात. एक असा व्यक्ती समजला जातो जो आपल्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळतो.
हे वाक्य दर्शवतं कमजोरी
अनेकदा आपण आपल्या एखाद्या प्रोजेक्टबाबत गोंधळलेलो असतो आणि आपल्या तोंडून कधी निघून जातं की, 'हे काही फिक्स नाही, पण आपल्याला हे काम करायचं आहे'. जेव्हा आपण याप्रकारची वाक्य बोलतो तेव्हा हे दर्शवत असतो की, माझ्यात आत्मविश्वास नाहीये. आपल्यासोबत राहणारे लोक आपल्या गोष्टी चांगलेच जाणून असतात. त्यामुळे तुमच्याकडून बोलली गेलेली अशी वाक्ये तुम्ही कमजोर असल्याचे दर्शवते.
या सवयीत आहे विश्वासाची कमतरता
काही लोकांना सॉरी हा शब्द फार सोपा वाटतो. त्यामुळे या शब्दाचा वापर ते लोक दिवसातून कित्येकदा करतात. याने तुमच्यातील मानवता तर दिसते पण पुन्हा पुन्हा सॉरी बोलणे तुमच्यातील आत्मविश्वास कमजोर असल्याचं दर्शवतं. तुमचं इम्प्रेशन दुसऱ्यांवर चुकीचं पडण्याआधी पुन्हा पुन्हा सॉरी बोलण्याची सवय बदला.
असे कधीच बोलू नका
आपण आपल्या रिअल लाइफमध्ये काही अशा शब्दांचा वापर करत असतो, ज्यांना प्रोफेशनल लाइफमध्ये बॅड मॅनर्स मानलं जातं. उदाहरण द्यायचं तर अरे यार, ओह नो, नो वे सारखे शब्द ऑफिशिअल लाइममध्ये चांगली इमेज बनवत नाहीत.