Valentine Day : 'या' सुंदर शब्दांनी व्यक्त करा तुमच्या खास भावना!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 10:25 AM2019-02-14T10:25:48+5:302019-02-14T10:26:28+5:30
१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. प्रेम व्यक्त करण्याचा हा अनोखा दिवस. या दिवशी अनेक दिवसांपासून लपवून ठेवलेलं प्रेम व्यक्त करू शकतात.
१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. प्रेम व्यक्त करण्याचा हा अनोखा दिवस. या दिवशी अनेक दिवसांपासून लपवून ठेवलेलं प्रेम व्यक्त करू शकतात. किंवा त्याच बरोबर आपल्या प्रियकराला खास सरप्राईज देऊन हा दिवस साजरा केला जातो. फेब्रुवारी महिना हा युरोपमध्ये तसा रोमान्सचा महिना मानला जातो. विशेषत: ब्रिटन आणि फ्रान्समध्ये तेथील पक्ष्यांचा तो समागमाचा महिना असतो.
दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
पाहशील जिथे जिथे नजर उचलून
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यांत दुःखांचे अश्रू
तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन
तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझीच आहे
मी एका हाताने
आपल्या आयुष्यातील सर्व अडचणींवर मात करेन
सर्वांशी लढेन जोपर्यंत माझा दुसरा हात
तुझ्या हातात असेल..
दिवसामागून दिवस गेले
उत्तर तुझे कळेना
आजच्या या प्रेमदिवशी
,संपव माझ्या वेदना
प्रेम माझं तुझ्यावरचं
कोणत्याच शब्दात
मावणार नाही
तुला मिठीत घेताच कळतं..
आता त्याचीही गरज
भासणार नाही
काही नाती जोडली जातात
काही जोडावी लागतात
काही नाती जपावी लागतात
तर काही आपोआपच जपली जातात
आणि यालाच प्रेम म्हणतात…
तुझ्याशिवाय दुसरीचा विचार करणे
ही कल्पनाच सहत होत नाही
कारण तुझ्याशिवाय माझ्या मनात
इतर कुणालाही स्थान नाही
तुझ्यावरचं प्रेम व्यक्त करणं
मला काही जमत नाही
तुझ्या आठवणींशिवाय
मन मात्र कशातच रमत नाही
डोळ्यातल्या स्वप्नाला
कधी प्रत्यक्षातही आण
किती प्रेम करतो तुझ्यावर
हे न सांगताही जाणा…
मेरे चेहरे की हंसी हो तुम,
मेरे दिल की हर खुशी हो तुम,
मेरे होंठों की मुस्कान हो तुम,
धड़कता है मेरा ये दिल जिसके लिए,
वही मेरी जान हो तुम।।
अब तो शाम-ओ-सहर मुझे रहता है बस खयाल तेरा,
कुछ इस कदर दुआओ सा मिला है मुझे साथ तेरा,
की अब कोई शिकवा और शिकायत नहीं उस खुदा से,
बस एक तुम्हें पाकर खुशियों से भर गया ये दामन मेरा।।
हर पल ने कहा एक पल से,
पल भर के लिए आप मेरे सामने आ जाओ,
पल भर का साथ कुछ ऐसा हो,
कि हर पल तुम ही याद आओ।।
चले गए हैं दूर कुछ पल के लिए,
मगर करीब हैं हर पल के लिए,
कैसे भुलाएंगे आपको इक पल के लिए,
जब हो चुका है प्यार उम्र भर के लिए।।
हमें जरूरत नहीं किसी अल्फ़ाज़ की
प्यार तो चीज़ है बस एहसास की
पास होते आप तो मंज़र कुछ और ही होता
लेकिन दूर से खबर है हमे आपकी हर धड़कन की।