Valentine's Day ; राशीनुसार जाणून घ्या पार्टनरसोबत कसा असेल तुमचा व्हॅलेनटाईन वीक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2020 02:28 PM2020-02-03T14:28:59+5:302020-02-03T14:48:50+5:30
सध्या फेब्रवारी महिना सुरू झाला आहे. तरूण -तरूणींना अगदी उत्साह देणारा हा महिना आहे.
सध्या फेब्रवारी महिना सुरू झाला आहे. तरूण -तरूणींना अगदी उत्साह देणारा हा महिना आहे. कारण वेगवेगळे प्रेमाचं प्रतिक असणारे डेज् या महिन्यात साजरे केले जातात. आज आम्ही तुम्हाला कोणत्या राशीच्या व्यक्तीला हा आठवडा आपल्या पार्टनरसोबत कसा जाणार आहे हे सांगणार आहोत.
मेष
या आठवड्यात तुम्ही विचार वेगळा कराल आणि काहीतरी वेगळंच होण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला सहनशीलता ठेवून परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. तसंच मोठयांचे मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला या आठवड्यात मिळेल. या आठवड्याच्या शेवटाला तुम्हाला आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ
या आठवड्यात वृषभ राशीचे लोक आपलं लव्हलाईफला उत्साहीपणे जगू शकतात. त्यांना आपल्या पार्टनरसोबत फिरायला जाण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. जर तुम्ही संयमाने काम केलेत जर शांत वाटेल तसंच सुख,शांती मिळेल.
मिथून
मिथून राशीच्या लोकांना हा आठवडा खूपच रोमॅन्टिक असेल. पार्टनरसोबत अंडरस्टॅडिंग वाढेल. सकारात्मक विचार तुमचे असतील. आठवड्याच्या शेवटाकडे येताना तुम्ही पार्टनरसोबत शॉपिंग करण्याचा आनंद घ्याल.
कर्क
झालेल्या वादांमधून तुम्ही तोडगा काढण्याचा विचार कराल तरच तुमचं नातं व्यवस्थित राहील. तसंच तुम्हाला पार्टनर कडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळण्याची शक्यता आहे. घरात सुख आणि शांती राहण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे.
सिंह
या आठवड्यात सिंह राशीचे व्यक्ती आपल्या पार्टनरसोबत धार्मिक स्थळांना भेट देण्याची शक्यता आहे. अनेक प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला या आठवड्यात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही सिंगल असाल तर पार्टनर मिळण्याची शक्यता आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांमध्ये आणि त्यांच्या पार्टनरमध्ये वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे. तसंच वाद निर्माण होऊ शकतात. आठवड्याच्या शेवटी तुम्ही कुटुंबाला आणि पार्टनरला वेळ द्याल.
तुळ
तुळ राशीचे लोक चार्मिंग पर्सनॅलिटीमुळे आपल्या पार्टनरला आकर्षीत करतील. हा आठवडा तुमच्यासाठी खूप रोमॅन्टिक असेल. या आठवड्यात तुम्ही नवीन ठिकाणी शिफ्ट होण्याचा विचार कराल.
वृश्चिक
हा आठवडा तुमचा खूप चांगला आणि रोमॅन्टिक सुद्धा असेल तसचं पार्टनर सोबत कुठेतरी लांब फिरण्याचा प्लॅन तुम्ही कराल.
धनू
तुमची वेळ न घालवता निर्णय घेण्याची सवय तुमच्या आणि पार्टनरच्या नात्यासाठी चांगली असेल. जितका जास्तवेळ तुम्ही संयम ठेवाल तितकाच जास्त वेळ तुमच्या पार्टनरसाठी आणि तुमच्यासाठी चांगलं ठरेल.
मकर
मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात आपल्या पार्टनरकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. तुमचं लव्हलाईफ आनंदी करण्यासाठी तुम्हाला महिलेची मदत होईल. मनातल्या गोष्टी शेअर न केल्यामुळे तुम्हाला त्रास सुद्धा होऊ शकतो.
कुंभ
या आठवड्यात तुम्हाला घरच्यांचा आर्शिवाद मिळेल. तुमच्या रिलेशनला घेऊन जर तुम्ही जास्त पजेसिव्ह असाल तर तुम्हाला मानसीक त्रास सुद्धा होऊ शकतो. हा आठवडा तुमच्या आणि तुमच्या पार्टनरसाठी अनूकूल असेल
मीन
तु्मच्या पार्टनरच्या आणि तुमच्या नात्यात प्रतिकुल परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे साभांळून वागा. आठवड्याच्या शेवटाकडे येताना तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. पार्टनर तुम्हाला वेळ देईल. तसंच चांगलं वातावरण तयार करण्यासाठी पार्टनरकडून प्रयत्न केला जाईल.