#ValentineWeek2018 : आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी वापरा 'यापैकी' एक हटके पध्दत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2018 03:36 PM2018-02-08T15:36:23+5:302018-02-08T17:59:18+5:30

प्रपोज डेला व्हॅलेंटाईनला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवायच्या असतील तर आम्ही सांगतो तुम्हाला १० पध्दती. यापैकी एक नक्की करु शकता ट्राय आजच्या दिवशी.

#ValentineWeek2018 : how to propose your valentine on the occassion of valentines day | #ValentineWeek2018 : आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी वापरा 'यापैकी' एक हटके पध्दत

#ValentineWeek2018 : आवडत्या व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी वापरा 'यापैकी' एक हटके पध्दत

googlenewsNext
ठळक मुद्देप्रपोज डे यादिवशी तुम्ही ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता तिला आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवाव्यात.आपल्या मनातल्या तिला किंवा त्याला मनातील भावना सांगण्यासाठी लोक यादिवसाची वाट पाहत असतात.आपल्या व्हॅलेंटाईनला कसं प्रपोज करावं हे जर तुम्हाला सुचत नसेल तर प्रपोज करण्याचे हे काही पर्याय आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत.

मुंबई : कालपासून जगभरात व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात झालीये आणि आज या वीकचा दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. ह्या दिवशी तुम्ही ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करता व जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यभरासाठी तुमच्यासोबत हवी आहे, तिला किंवा त्याला मनातील भावना सांगण्यासाठी लोक यादिवसाची वाट पाहत असतात. कुणाला प्रपोज करायचं आहे म्हटलं की कोणाच्याही पोटात गोळा येतोच. त्यात प्रत्येकाची प्रपोज करण्याची पद्धत वेगळी असते आणि समोरच्या व्यक्तीचं त्यावर रिअॅक्ट होणंही वेगवेगळं असतं. पण जर तुम्हाला सुचत नसेल की आपल्या व्हॅलेंटाईनला कसं प्रपोज करावं तर प्रपोज करण्याचे हे काही पर्याय आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत. तुम्हाला कोणता शक्य आहे आणि कोणती पध्दत समोरच्यालाही आवडेल त्यावरुन तुम्ही त्या व्यक्तीला प्रपोज करु शकता.  

१) बॅालला बनवा आपला रिंग बॅाक्स

एखाद्या मुलीला कोणत्या मुलीला प्रपोज करायचं असेल तर ही हटके पध्दत आहे. फक्त अट एकच की तो क्रिकेटचा भारी चाहता असला पाहिजे. कोणत्याही बॅालची मदत घेऊन तुम्ही त्याला प्रपोज करू शकता. एक बॉल घेऊन मधून कापून मधल्या भागात पोकळी तयार करा. तिथे तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या किंवा थर्माकॉल बॉल्स टाकु शकता. त्यात एक अंगठी ठेऊन तो बॉल आपल्या व्हॅलेंटाईनला द्या आणि आपल्या शब्दात त्याला प्रपोज करा. अर्ध काम तर त्या बॉलमधल्या अंगठीनं केलं असेल बाकी सगळी जबाबदारी तुमच्या बच्चन देण्यावर आहे.

२) शब्दांचा खेळ - स्क्रॅबल गेम  

आपण सर्वांनीच कधी ना कधी स्क्रॅबल गेम खेळला असेल. त्यात अक्षरं जोडून शब्द तयार करायचे असतात. या गेमची मदत घेऊन तुम्ही आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करु शकता. या गेममध्ये अक्षरं जोडून आपल्या प्रिय व्यक्तीचं नाव तयार करा आणि त्या अक्षरांनाच जोडून वाक्य तयार करून आपल्या मनातील भावना व्यक्त करा. उदा. Will You Marry Me? किंवा Will You Be My Valentine?  

३) लॅाकेट्स आणि रिंग्स

हातातल्या अंगठीत किंवा गळ्यातील चैनीमध्ये आपल्या प्रिय व्यक्तीचा आणि स्वतःचा फोटो बाजूबाजूला ठेवणं ही जुनी पद्धत आहे पण हीच जुनी पद्धत आजही तरूणाईच्या पसंतीची आहे. किंवा त्यातही आता हा नवा प्रकार आला आहे. दोन बाजूंनी उघडणारी लॉकेट किंवा कि-चेन्स मार्केटमध्ये मिळतात किंवा गिफ्ट शॉपमध्येही ग्राहकाच्या मागणीनुसार बनवून दिली जातात. ते लॉकेट उघडलं की त्यात एका कागदावर आपला संदेश लिहता येतो. बस्स्स !! फक्त हे लॉकेट त्या व्यक्तीपर्यंत कसं पोहचेल याची काळजी आपल्याला घ्यायची असते.

 

४) तंत्रज्ञान अर्थात सोशल मीडिया

आजच्या फेसबूक आणि वॅाट्सअॅपच्या दुनियेत प्रपोज करणं हे अगदी एका क्लिकवर सोपं झालं आहे. पण त्यातूनच डिजिटल गिफ्टस, व्हिडिओज, ग्रीटिंग्स यांच्या माध्यमातून तुम्ही प्रपोज करू शकता. दोघांच्या एकमेकांसोबतच्या फोटोंची एक व्हिडीयो बनवून, बॅकग्राऊंडला एखादं रोमान्टीक गाणं टाकलं तरी ‘ती’ खुश होऊन जाते. तसंच काही फोटोंचं कोलाज बनवून तो फोटो तिला शेअर करुन आपल्या मनातली गोष्ट तिला सांगावी आणि तिच्या उत्तराची वाट पाहावी.

५) कॉफीवेड्यांसाठी

तुम्ही त्या व्यक्तीला कॉफीसाठी किंवा ड्रिंकसाठी घेऊन जाऊ शकता. कॉफी मगमध्ये सर्वात खाली किंवा ड्रिंकच्या ग्लासच्या आतल्या बाजूला आपल्या मनातील भावना लिहून ठेवू शकता. तिचं ड्रिंक संपलं की तिला ते सुंदर सरप्राईज मिळेल आणि ती खुश होईल.

६) आवडता पदार्थ

'ती'चा आवडता पदार्थ किंवा 'त्या'चा आवडता पदार्थ जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही दोघं तो आवडता पदार्थ खाण्यासाठी बाहेर जाऊ शकता आणि शेअर करून खाऊ शकता. खाता खाता तिला प्रपोज करु शकता किंवा तिथेच टिश्यु पेपरवर किंवा प्लेटमध्ये कशाने तरी आपल्या मनातल्या भावना लिहून तिला ऐकवू शकता.

७) सैराट स्टाईल

खरंतर मुलांनी प्रपोज करायचं आणि मग मुलींनी त्याचा ‘इजहार’ करायचा ही पूर्वापार चालत आलेली संकल्पना. पण ज्या मुलींमध्ये खरंच हिंमत आहे अशांना सैराट स्टाईल पध्दत वापरता येईल. समोरच्या मुलाचा अंदाज घेऊन मग त्याला गप्पा मारता मारता प्रपोज करावे. त्याचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्याला द्यावे, त्यावर चुकीची प्रतिक्रिया देऊ नये.

८) बीचवर वॉल्क अँड टॉल्क

तिला जर समुद्रावर चालणं आणि फिरणं आवडत असेल तर एका रम्य संध्याकाळी तिला घेऊन जा एखाद्या बीचवर फिरायला. चालता चालता आणि बोलता बोलता तिला आपल्या मनातलं सांगून टाका आणि मावळणाऱ्या सूर्यासह तिच्या उत्तराची वाट पाहा.

९) जन्नत स्टाईल प्रपोज

आपलं एखादीवर फार मनापासून प्रेम असतं मात्र ते तिला कसं सांगावं हे कळतं नसतं. आपल्या मनातल्या भावना ती समजू शकेल का आणि तिलाही त्या पटतील का या विचारात त्याच्या अनेक रात्री जागून जातात. अशा ‘खऱ्या’ प्रेमवीरांसाठी ही एक पध्दत खरंच रोमँटीक आणि फिल्मी आहे. जन्नत चित्रपटात हिरो जसा रस्त्यात मुलीच्या गाडीसमोर गाडी थांबवून तिला प्रपोज करतो ते तरुणांमध्ये ऑल टाईम फेव्हरिट आहे. स्वत:सह इतरांच्या जीवांची काळजी घेत अत्यल्प रहदारीच्या ठिकाणी हे करता येईल. पण तिला हा प्रकार आवडला नाही तर रस्त्यात गाल लाल होण्याची शक्यता आहे.

१०) सरप्राईज प्लॅन

सरप्राईज कसे कसे प्लॅन करायचे हे काय आता तुम्हाला वेगळे सांगायला नको. आत्तापर्यंत तुम्ही असे अनेक वाढदिवस किंवा इतर पार्टी प्लॅन केल्या असणार. असं छानसं कॅन्डल लाईट डिनर किंवा रुममध्ये गुलाबं किंवा हार्ट शेप फुगे इ. पध्दती मुलींना फार आवडतात. असंही करुन पाहू शकता, पण जर तिच्या होकाराची शाश्वती असेल तरच धोका पत्करा. नाहीतर होणारा आर्थिक खर्च तिच्या नकाराच्या दु:खाची तीव्रता वाढवेल.  

आता आम्ही तुम्हाला प्रपोज करण्याच्या या सोप्या आणि सर्वांच्या आवडत्या पध्दती सांगितल्या आहेत. आता तुम्ही ठरवा की यापैकी काय करणं तुम्हाला शक्य आहे. मात्र यापैकी काहीही करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असणं आवश्यक आहे, ते म्हणजे प्रेम. कारण मनात प्रेमाची भावनाच नसेल तर हे सगळं कसंही केलं तरी व्यर्थ आहे.

Web Title: #ValentineWeek2018 : how to propose your valentine on the occassion of valentines day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.