लहान मुलं बिघडू नयेत असं वाटत असेल तर हे नक्की वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 05:43 PM2020-01-03T17:43:25+5:302020-01-03T17:51:13+5:30

लहान मुलं सुरुवातीच्या काळात घरच्यांनी केलेल्या संस्कारानुसार वागत असतात.

What are the major reasons behind the children behaviour | लहान मुलं बिघडू नयेत असं वाटत असेल तर हे नक्की वाचा

लहान मुलं बिघडू नयेत असं वाटत असेल तर हे नक्की वाचा

Next

लहान मुलं सुरुवातीच्या काळात घरच्यांनी केलेल्या संस्कारानुसार वागत असतात. पण कालातराने त्यांच्या वागणूकीत बदल होत जातो. घरच्यांचं ऐकण्यापेक्षा बाहेरच्या लोकांच अधिक ऐकलं जात. कारण त्यावेळी त्यांना घरातल्यांपेक्षा बाहेरचे लोकं अधिक आपलेसे वाटत असतात. तुम्ही मुलांच्या अशा वागण्याबद्दल कधी विचार केला आहे का? मुलांचं वर्तन अनुकूल नसेल तर काही प्रमाणात  घरातील लोक सुध्दा जबाबदार असतात.  मुलांना बिघडवण्यापासून वाचवायचं असेल तर तुम्ही काळजी गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. चला तर मग जाणून घेऊया असं का होतं. 

(Image credit- relegionnews.com)

अनेकदा मोठ्या किंवा लहान मुलांची लहान भावडांशी तुलना केली तर त्यांच्यावर नकारात्मक परीणाम होत असतो.  तसंच त्यांना न्यूनगंड येण्याची शक्यता असते. त्यामुळे मुलांचं काही चुकलं तर त्यांना समजावून सांगा. पण तुलना करू नका. लहान मुलं अनेकदा मोठ्या चुका करतात. त्यामुळे मोठ्यांची चिडचिड होत असते. मुलं तर चुका करत असतील तर त्यांना ओरडू नका कारण चुकांमधूनच मुलं शिकत असतात. 

मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांच्यावर अपेक्षाचे ओझे घालणे सोडा. कारण त्यामुळे काही उपयोग होणार नसतो. मुलं आपल्या आजूबाजूला जे बघत असतात. तसंच ते वागत असतात. मुलांना अभ्यास करण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट करण्यासाठी दबाव टाकू नका.  कारण त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. 

(image credit- paranting for brain)

लहान मुलांना सारख सारख ओरडल्यामुळे त्याच्यावर नकारात्मक परीणाम होऊन भीती वाटू शकते. मुलं कोणतीही गोष्ट सांगायला तुम्हाला घाबरू शकतात. यासाठी मुलांना रागवत असताना विचार करा. जर मुलांकडून एखादी चूक झाली असेल तर त्यांना बंद खोलीत बंद करून ठेवत असाल तर  तुम्हाला महागात पडू शकतं.  त्यामुळे मुलं जास्त बिघडण्याची शक्यता असते.  सतत आरडाओरडा केल्यामुळे आणि मारण्याची धमकी दिलीत तर मुलं चुकीचं पाऊल उचलू शकतात. 

Web Title: What are the major reasons behind the children behaviour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.