पार्टनरकडून गरजा पूर्ण होत नसतील तर काय कराल?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2020 02:09 PM2020-02-05T14:09:45+5:302020-02-05T14:20:40+5:30
रिलेशनशिपमध्ये असताना अनेक मुलं आणि मुली फारसे खूश नसतात.
(image credit-techieworld)
रिलेशनशिपमध्ये असताना अनेक मुलं आणि मुली फारसे खूश नसतात. मग त्यांना असं वाटतं की मी सिंन्गल का नाही. उगाच कमिटमेंट केली. रिलेशनशिप असं बोरिंग वाटण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण सगळ्यात महत्वाचं कारणं म्हणजे पार्टनर कडून आपल्या गरजा पूर्ण न होणं. आपण ज्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करत असतो. किंवा जी व्यक्ती आपला पार्टनर असते. त्या व्यक्तीकडून आपण खूपचं जास्त अपेक्षा ठेवून असतो. जर पार्टनर कडून आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी मिळत नसतील तर भांडणं सुद्धा होतात. कारण प्रत्येकवेळी आपण आपल्या इच्छांबद्दल पार्टनरला बोलून दाखवत नाही.
(image credit- ANI)
कारण आपल्या गर्लफ्रेंडने किंवा बॉयफ्रेंडने न सांगता सगळ करायाला हवं असं आपल्याला वाटत असतं. त्यामुळे अनेकदा भांडणाचं कारण नसताना सुद्धा तुम्ही पार्टनरवर चिडचिड करता. जर तुमच्या सुद्धा गरजा पार्टनरकडून पूर्ण होत नसतील तर आज आम्ही तुम्हाला काही खास टीप्स सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही पार्टनरकडून आपल्या गरजा पूर्ण करून घेऊ शकता.
कारण शोधण्याचा प्रयत्न करा
(image credit-happy wedding app)
सगळ्यात आधी तुम्हाला पार्टनर कडून काय हवयं, कशामुळे तुम्ही नाराज असता याचे कारण शोधा. त्यानंतर या गोष्टींना पार्टनरपर्यंत पोहोचवण्यचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या पार्टनरच्या सगळ्या गरजा पूर्ण करता की नाही. याकडे सुद्धा लक्ष असू द्या.
आपल्या गरजांबाबत खुलेपणाने बोला.
कोणतंही नातं यशस्वीपणे टिकवण्यासाठी सगळ्यात मह्त्वाचा असतो तो म्हणजे संवाद जर तुमच्यात संवादाचा अभाव असेल तर समस्या वाढण्याची शक्य़ता असते. एक्सपर्टसच्यामते पार्टनरकडून असलेल्या शारीरिक, मानसीक, भावनीक आणि आर्थिक गरजा पूर्ण होत नसतील तर खुलेपणाने बोला. पार्टनरला स्वतःहून आपल्या मनातलं कळण्याची वाट पाहू नका.
सेंसिटिव्ह व्हा
अनेकांना आपल्या गरजांबद्दल पार्टनरशी थेट बोलायला आवडत नाही. त्यांना या गोष्टीची भीती असते की
आपण असं सांगितलं तर पार्टनर आपल्याबदद्ल काय विचार करेल. म्हणून दोघांनाही एकमेकांच्या बाबतीत सेंसिटिव्ह राहणं नातं टिकवून ठेवण्यासाठी उत्तम ठरेल. स्वतःच्या इच्छा आणि गरजांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करू नका. पार्टनरकडे व्यक्त व्हा. कोणत्याही प्रकारे न लाजता आपल्या भावना पार्टनरशी शेअर करा. ( हे पण वाचा-Valentine's Day List 2020 : व्हॅलेंटाईन वीक सुरू होण्याआधीच बघा कोणत्या दिवशी कोणता 'डे' साजरा कराल)