व्हॉट्सअ‍ॅप ‘डीलिट फॉर एव्हरीवन’ : 7 मिनिटांच्या डीलिट खेळाची 5 कारणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 03:55 PM2017-11-03T15:55:37+5:302017-11-03T15:56:33+5:30

आपण मेसेज डीलिट केल्याचं इतरांना कळतंच, आणि ते कळणंही गैरसमज निर्माण करूच शकतं.

Whatsapp 'Delete for EVERYONE': 5 reasons for 7 minutes delete game | व्हॉट्सअ‍ॅप ‘डीलिट फॉर एव्हरीवन’ : 7 मिनिटांच्या डीलिट खेळाची 5 कारणं

व्हॉट्सअ‍ॅप ‘डीलिट फॉर एव्हरीवन’ : 7 मिनिटांच्या डीलिट खेळाची 5 कारणं

Next
ठळक मुद्देडीलिट चा पर्याय आहे म्हणून 7 मिनिटं स्टेकला लावू नका.

व्हॉट्सअ‍ॅपने डीलिट  फॉर एव्हरीवनचा पर्याय दिल्यानं जगभरात म्हणे आनंदोत्सव साजरा झाला. आपण एखाद्या व्यक्तीला अगर गटाला पाठवलेला मेसेज, फोटो, व्हिडीओ आत सात मिनिटांच्या आत डीलिट  करता येणार आहे. तो डीलिट  करण्याचा पर्याय आहे पण म्हणून आपण डीलिट केल्याचं कुणाला कळत नाही असं नाही. ते कळतंच. आणि ते कळणंही हे ही गैरसमजाला पुरेसं निमित्त देऊ शकतं. त्या गैरसमजातून भविष्यांत नात्यांत अधिक तणाव निर्माण होऊच शकतात. पण आज अनेकांना हा डीलिटचा पर्याय का महत्वाचा वाटतो. त्याची पाच कारणं आहेत. ती कारणं आपल्यालाही लागू पडतात का, तपासून पहा.


1) तुम्ही ऑफिसच्या ग्रूपवर काहीबाही लिहिलं. रागाच्या भरात. बॉसला सुनावलं. पण काही मिनिटातच लक्षात येतं की असं नको होतं लिहायला. ते पटकन डीलिट केलं तर बरं. मग अनेकजण तातडीनं लिहिलेलं डीलिट करतात. अर्थात म्हणून डॅमेज कण्ट्रोल होत नाही पण कुणी स्क्रिनशॉट घेतला नाही तर ते पुसलं तरी जातं.
2) नात्यात, भांडणात असं अनेकदा होतं. आपण बोलून जातो.ताडताड बोलतो. समोरचा ऑफलाइन असेल तरी लिहित सुटतो. व्हॉट्सअ‍ॅपवर भांडतो. त्यावेळी हा मेसेज पुसण्याचा पर्याय बरा पडतो.
3) जे लिहिलं, त्याचा कुणी स्क्रिनशॉट घेऊन ठेवेल अशी लिहिल्यावर भीती वाटली तर पुढच्याच मिन्टाला ते पुसताही येतं आता.

4) अलिकडचा एक भयंकर प्रकार म्हणजे प्रेमात असलेले अनेकजण परस्परांना काही न्यूड फोटो वगैरे टाकतात. पण अनेकदा ते टाकल्यावर पश्चाताप होतो. 7 मिनिटात आता तो पश्चाताप दुरुस्त करण्याची संधी आहे.


5) आपण चुकून, अगदीच नजरचुकीने एखाद्या ग्रूपवर, व्यक्तीला भलताच मेसेज पाठवला असं लक्षात आलं तर ओशाळं होण्यापेक्षा तो मेसेज वेळेच्या आत पुसलेला बरा.
अर्थात या पुसापुशीसाठी हातात फक्त 7 मिनिटं आहेत, आणि त्यात चूक दुरुस्त नाही झाली तर गैरसमज अटळ आहेतच.

Web Title: Whatsapp 'Delete for EVERYONE': 5 reasons for 7 minutes delete game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.