...जेव्हा रामदेव बाबा फुटबॉल खेळतात !
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2016 05:12 PM2016-07-25T17:12:26+5:302016-07-25T22:42:26+5:30
योगगुरु रामदेव बाबा नेहमीच मीडियाच्या केंद्रस्थानी असतात. आता रामदेव बाबांचा फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Next
य गगुरु रामदेव बाबा नेहमीच मीडियाच्या केंद्रस्थानी असतात. आता रामदेव बाबांचा फुटबॉल खेळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्किल इंडिया, स्वच्छ भारत सारख्या अभियानांना मजबूत करण्यासाठी स्टार्स फुटबॉल क्लब आणि खासदारांमध्ये हा फुटबॉलचा सामना खेळण्यात आला होता.
या सामन्यात खासदार आणि अभिनेत्यांपेक्षा रामदेव बाबाच जास्त प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर हा सामना खेळण्यात आला होता. रामदेव बाबांनी मैदानावर एखाद्या पारंगत फुटबॉलपटूसारखी किक मारून सगळ्यांनाच आश्चयार्चा धक्का दिला आहे. रामदेव बाबा धोतीवरच शूज घालून फुटबॉल खेळताना दिसत आहेत. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रामदेव बाबांनी फुटबॉलला किक मारण्यासाठी धाव घेतल्यानं सामना आणखी रोमांचक झाला. हे सामने बेटी बचाओ, बेटी पढाओ, स्किल इंडिया, स्वच्छ भारत सारख्या अभियानांना चालना देण्यासाठी आयोजित करण्यात आले होते.
एका टीममध्ये बॉलिवूड सेलिब्रिटी होते. तर दुस-या टीममध्ये भाजप खासदार होते. बॉलिवूड संघाचा कर्णधार अभिषेक बच्चन असून, टीममध्ये रणबीर, अर्जुन कपूर, दीनो मोरिया, सिद्धार्थ मल्होत्रा सारखे अभिनेते होते. तर खासदारांच्या संघाचे कर्णधार बाबुल सुप्रियो होते. या फुटबॉल सामन्यामुळे योगगुरु रामदेव बाबांचा आणखी एक गुण जगासमोर आला आहे.