पार्टनरचा फोन चेक करण्याची तीव्र इच्छा होण्याचं काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 04:24 PM2019-10-30T16:24:10+5:302019-10-30T16:27:19+5:30

आपल्या पार्टनरचा फोन चेक करण्याची अनेकांना असणारी सवय फारच कॉमन आहे. सामान्यपणे जास्तीत जास्त महिला असं करतात.

Why do people have this urge of checking partner's phone says study | पार्टनरचा फोन चेक करण्याची तीव्र इच्छा होण्याचं काय आहे कारण?

पार्टनरचा फोन चेक करण्याची तीव्र इच्छा होण्याचं काय आहे कारण?

Next

(Image Credit : bestcellphonespyapps.com)

आपल्या पार्टनरचा फोन चेक करण्याची अनेकांना असणारी सवय फारच कॉमन आहे. सामान्यपणे जास्तीत जास्त महिला असं करतात. जेव्हा पुरूष पार्टनर आपल्या फोनचा पासवर्ड बदलतात महिला काहीतरी गोड बोलून पार्टनरकडून पासवर्ड काढून घेतात. काही पुरूषांना हे माहीत असतं की, त्यांची महिला पार्टनर असं का करत आहे. पण ते काही बोलत नाहीत. पण काही महिलांना ही पार्टनरचा फोन चेक करण्याची सवय का असते? याचं एक धक्कादायक कारण रिसर्चमधून समोर आलं आहे.

हे आहे कारण

(Image Credit : irishmirror.ie)

यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटीश कोलंबिया आणि यूनिव्हर्सिटी ऑफ लिस्बन यांच्या संयुक्त रिसर्चमधून ही बाब समोर आली आहे की, जास्तीत जास्त लोक आपल्या पार्टनरचा किंवा मित्रांचा फोन चेक करतात. याचं मुख्य कारण म्हणजे ईर्ष्या असते आणि सोबतच त्यांचं इंटेशन हे असतं की, ते दुसऱ्यांसोबतच त्यांच्या पार्टनरच्या नात्यांना कंट्रोल करायचं असतं. आश्चर्याची बाब ही आहे की, जास्तीत जास्त लोक हे त्यांच्या पार्टनर, मित्रांना फोनमध्ये ढवळाढवळ करण्यापासून रोखतही नाहीत. तर असेही काही लोक आहेत ज्यांना ही सवय पसंत नाही आणि या कारणाने त्यांचं नातंही तुटतं. 

रिसर्च कसा केला गेला?

 

हा रिसर्च फार छोट्या प्रमाणावर करण्यात आला होती. पण रिसर्चमधून समोर आलेले निष्कर्ष आणि मुद्दे हैराण करणारे होते. रिसर्चमध्ये १०२ लोकांना सहभागी करून घेण्यात आले होते. आणि त्यांना विचारण्यात आलं की, त्यांनी कधी पार्टनरचा फोन चेक केला का? किंवा त्यांचा फोन कुणी चेक केला का?

त्यानंतर त्यांना हेही सांगायचं होतं की, फोन चेक केल्यावर त्यांच्या नात्यावर काय परिणाम झाला. पार्टनरच्या परवानगीशिवाय त्यांचा फोन चेक केल्याचं त्यांना कळालं का? रिसर्चनुसार, असं केल्यावर ४५ टक्के लोकांचं नातं तुटलं तर ५५ टक्के लोकांचं नातं अशाप्रकारच्या घटनेनंतरही सुरू होतं. 

फोन चेक करण्याची सवय ऑब्सेशन होऊ नये

(Image Credit : independent.ie)

सीनिअर कन्सल्टींग सायकॉलॉजिस्ट श्वेता सिंह यांनी नवभारत टाइम्सला सांगितले की, 'पार्टनरला न सांगता किंवा परवानगी न घेता त्यांचा फोन चेक करण्याचा अर्थ हा आहे की, तुम्ही त्यांची जासूसी करत आहे. आणि ही बाब हळूहळू तुमची सवय होते. जर ही सवय प्रमाणापेक्षा जास्त वाढली तर ऑब्सेशन होते. आणि मग पार्टनरच्या प्रत्येक गोष्टीबाबत जाणून घेण्याची तुमच्या तीव्र इच्छा निर्माण होते'.


Web Title: Why do people have this urge of checking partner's phone says study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.