फॅशनच्या नावाखाली मुलं वाट्टेल ते करतात, असं वाटतं तुम्हाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 05:27 PM2017-10-09T17:27:09+5:302017-10-09T17:27:25+5:30

मुलं जे कपडे घालतात, ज्या केशरचना करतात, त्याचं कौतूक खरंच नाहीच का करता येत?

why parents hate kids fashion? | फॅशनच्या नावाखाली मुलं वाट्टेल ते करतात, असं वाटतं तुम्हाला?

फॅशनच्या नावाखाली मुलं वाट्टेल ते करतात, असं वाटतं तुम्हाला?

googlenewsNext
ठळक मुद्देमुलं जे जे करतात ते ते चूक, असं पालकांना का वाटतं?

-योगिता तोडकर

चार-पाच दिवसांपूर्वी माझ्या घरी एक छोटा स्नेहमेळावा झाला. जेवणं झाली, गप्पा चालू होत्या. एका बाजूला मुलं टीव्ही पाहत होती. मध्येच एकजण म्हणाला की हे असं टीव्ही पहायचा आणि मग त्यातल्या नवीन फॅशन्स पाहायच्या. तेच करायचं. घालायचं. थोडय़ा वेळानं सगळी मुलं उठून गच्चीत गप्पा मारायला निघून गेली. पण आम्हाला चर्चेला जणू विषय देऊन गेली. आजकालच्या मुलांचा पेहराव, त्यांच्या  केसांच्या स्टाईल्स यावर सत्नच सुरु  झालं. वाटलं अनेक पालकांच्या दृष्टीनं गंभीर विषय असतो हा.
मी त्यांना म्हटलं आपल्या आवडी निवडी आपल्या त्यांच्याकडून असणार्‍या  अपेक्षा हा त्यांच्या पेहरावाच्या निर्णयाचा पाया असावा का? आपल्या पिढीत नाही का आपण बदल केले? आपल्या पालकांना तरी कुठे मान्य होतं जे आपण घालायचो ते? ज्याप्रमाणे मुलांचा  अभ्यास, कामाचं स्वरूप यातील बदल आपण स्वीकारले, मग हे का नाही? एरव्ही आपण म्हणतोच की बदल ही जगातील स्थिर गोष्ट आहे. मग ती मुलं हे जगतायत तर आपण का आडवावं त्यांना? आपलं मुल जेंव्हा एखादा वेगळा पेहराव अथवा केशरचना करत तेंव्हा आपण खरंच उत्सुकतेने, कौतुकाने त्याकडे पाहतो का? ते त्याला कसं दिसतंय याबद्दल काही टिप्पणी देतो का? त्याने काही वेळा वेगवेगळ्या गोष्टी केल्यावर, त्यातली त्याला कुठली आवडली, का आवडली, मित्नाची  पाहून केली की स्वतर्‍च डोकं वापरून केली? यातलं नेमकं काय विचारतो आपण त्यांना? काहीच नाही. 
फक्त टीका सुरु.
मंडळी आपले मुलं काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असेल आणि तेही त्यांच्या स्वतर्‍च्या कल्पकतेतून तर त्यांना  वाव देणं हे पालक म्हणून आपलं काम आहे. ते करत असलेल्या या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांची विचारसरणी, आत्मविश्वास, स्वतर्‍ला सादर करण्याची पद्धत, स्वतर्‍ची मतं असणं, ती मांडणं या सगळ्यात सुसूत्नता यायला लागते. दर वेळेस आपण त्यांच्याबरोबर रंगभूमीवर असणं गरजेचं नाही. काही भूमिका पालकांनी पडद्यामागुनही कराव्यात. 
आणि अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण सगळ्यांनी. 
आपली मुलं तरुण होतात. पण अनेक पालक, त्यांचं  तरु णपण पेहरावातून  उठून दिसत असेल तर घरातच त्यांना एक स्पर्धक मिळतो. माणसाने मनाने तरु ण असावं असं म्हणतात, पेहरावाने नाही! पण पालक स्वतर्‍ तसं करत नाहीत. विचारा स्वतर्‍ला की पालक म्हणून  आपली पिढी खरंच फिटनेस साठी व्यायाम करते की जिम, डाएट फिगर मेंटेन करण्यासाठी होतो. आजकालच्या किती स्त्रिया चेहरे सुरकुतेपर्यंत शरीराला त्नास देतात. चेहराच तजेलदार नसेल तर तुम्ही किती बारीक आहात याला काय अर्थ? मुलांच्या लहानपणासून आपले वय, आपली शरीरयष्टी याला अनुरूप तुमचा पेहराव असेल तर मुलांवर संस्कारही तसेच होतात.  तुम्ही स्वीकारा अथवा स्वीकारू नका बदल होणारच आहेत. मग होणार्‍या बदलांकडे आपण सकारात्मकपणे पाहिलं तर त्यातून निश्चित काहीतरी चांगले निष्पन्न करता येईल. मुलांवर सतत टीका केली, शेरे मारले तरी ते त्यांना घालायचं तेच घालणार? पोषाखाबाबतची जी डिसेन्सी आपण त्यांना शिकवू पाहतो ती ही ते शिकणार नाहीत.

(लेखिका समुपदेशक आहेत)
yogita1883@gmail.com

Web Title: why parents hate kids fashion?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.