ऑनलाईन चॅटिंग करताना का उशीरा रिप्लाय करतात मुली, 'ही' आहेत धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2022 09:04 PM2022-08-07T21:04:12+5:302022-08-07T21:05:01+5:30
मुलींच्या लेट रिप्लाय करण्यामागे काही विशेष कारणं असतात. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहितीत देणार आहोत.
स्मार्टफोन आल्यापासून अनेकजण लोकांशी बोलण्यासाठी चॅटिंग अॅप्स वापर करतात. कॉलेजमधल्या किंवा तरुण वयातील मुलामुलींमध्ये हे चॅटिंगचे प्रमाण खूप जास्त आहे. एखाद्या नव्या नात्याची सुरुवात करणे असो किंवा जुने नाते जपणे असो. एकमेकांशी बोलण्यासाठी चॅटिंगचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. मात्र तुम्हाला माहित आहे का? चॅटिंगदरम्यान काही मुली खूप लेट रिप्लाय करतात. मुलींच्या लेट रिप्लाय करण्यामागे काही विशेष कारणं असतात. आज आम्ही तुम्हाला याबद्दलच माहितीत देणार आहोत.
खोटे कौतुक
हल्ली मुली खूप स्वावलंबी झाल्या आहेत. उगीच फार काल्पनिक जगात त्या वावरत नाहीत आणि एखाद्या नव्या नात्याची सुरुवात कराताना त्यांना खोटे कौतुक किंवा चांगुलपणाचा मुखवटा नको असतो. मुलींचे केले खोटे कौतुक त्यांना लगेच कळते आणि तुम्ही असे वारंवार करत असाल तर त्या तुमचे मॅसेज न पाहणे आणि पाहिल्यास तुम्हाला लेट रिप्लाय करणे पसंत करतात.
नवीन ओळख
तुमची ओळख नुकतीच झाली असेल तर त्या मुलींसाठी तुम्ही नवीन असता. तुम्ही एकमेकांचे नंबर घेतल्यानंतर चॅटिंगला सुरुवात करता. अनेकदा कुतूहलापोटी तुम्ही मुलींवर प्रश्नांचा भडीमार करता. त्यामुळे मुली वैतागतात. असे वागणे मुलींना अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्या तुमचे मॅसेजेस इग्नोर करायला सुरुवात करतात आणि लेट रिप्लाय देतात.
वाईट अनुभव
अँकेड मुलींना डीयूच्या एखाद्या माणसाकडून वाईट अनुभव मिळालेले असतात. तेव्हा मुली जास्तवेळ एकटे राहण्याचा प्रयत्न करतात आणि नवीन माणसावर विश्वास ठेवायला त्याच्याशी बोलायला खूप वेळ घेतात. त्यामुळे त्यांना समजून न घेता कुणी त्यांच्याशी सतत बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर मुलींना त्या व्यक्तीमध्ये अजिबात रस वाटत नाही. त्यामुळे त्या लेट रिप्लाय देतात.
कमी बोलण्याचा स्वभाव
काही मुलींना मुळातच जास्त बोलणे आणि अनोळखी मुलांशी बोलणे आवडत नाही. कदाचित त्या व्यस्तही असू शकतात. ज्यामुळे त्या वेळेवर उत्तर देऊ शकत नाही. म्हणून त्याचा चुकीचा अर्थ काढणे योग्य होणार नाही. झी न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला मुलींचे चांगले आणि सज्जन मित्र व्हायचे असेल तर मुलींना आदर द्या तसेच त्यांची परिस्थिती समजून घेऊन त्यांच्याशी बोला.