'या' कारणाने तुम्ही विसरू शकत नाही तुमचं पहिलं प्रेम!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 02:45 PM2019-09-24T14:45:14+5:302019-09-24T14:55:02+5:30
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं. ते कधीही विसरता येत नाही.... तुम्ही जर कधी प्रेम केलं असेल तर तुम्ही सुद्धा हे नाकारणार नाही.
(Image Credit : busy.org)
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, पहिलं प्रेम हे पहिलं प्रेम असतं. ते कधीही विसरता येत नाही.... तुम्ही जर कधी प्रेम केलं असेल तर तुम्ही सुद्धा हे नाकारणार नाही. पहिलं प्रेम असंच असतं की, ते आयुष्यभरासाठी लक्षात राहतं. आयुष्यभर आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात साठलेल्या असतात. पहिलं प्रेम, पहिला किस आणि पहिलं आलिंगण या अशा आठवणी असतात ज्या व्यक्ती कधीही विसरू शकत नाही.
जीवनाच्या प्रवासात अनेकांना वेगवेगळ्या वळणावर प्रेम होतं. पण पहिल्या प्रेमाचा विषय निघताच डोळ्यात एक वेगळीच चमक येते. पहिलं प्रेम हे कधीही विसरता येत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. पण कोणतं कारण आहे, ज्यामुळे कुणीही त्यांचं पहिलं प्रेम विसरू शकत नसतात. चला जाणून घेऊ ते कारण....
रिलेशनशिप एक्सपर्ट एडीना महल्ली यांचं यावर मत आहे की, तुमचं पहिलं प्रेम हा जीवनातील पहिला अनुभव असतो. हेच ते कारण असतं, ज्यामुळे तुम्ही कधीही पहिलं प्रेम विसरत नाहीत. एडीना सांगते की, आपल्या मेंदूत एक भाग असतो हिप्पोकॅंम्पस. यात आपल्या आठवणी आणि भावना असतात. मानसोपचारतज्ज्ञ मानतात की, आपल्याला दुसरीच्या तुलनेत पहिल्यांदा केलेल्या गोष्टी जास्त लक्षात राहतात.
अशात जीवनात तुम्ही घेतलेला पहिला अनुभव कधीही विसरू शकत नाहीत. इतकेच नाही तर तुम्ही तुमच्या नोकरीचा पहिला दिवसही विसरू शकत नाही, जसे की, पहिलं प्रेम. पहिल्या प्रेमात तुम्ही प्रेयसी किंवा प्रियकरासोबत भावनात्मक दृष्टीने इतके खोलवर जोडले गेलेले असता. त्यामुळे त्यांच्या आठवणी अधिक मजबूत असतात. पहिल्या प्रेमातील जाणीवा या फारच प्रबळ असतात, त्यामुळेच त्या कधी विसरता येत नाहीत किंवा मनातून जात नाही.