नात्यात कोणतंही टोकाचं पाऊल उचलण्याआधी 'या' गोष्टींचा विचार करा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 11:02 AM2019-10-17T11:02:12+5:302019-10-17T11:04:32+5:30
हल्लीच्या काळात तुम्हाला प्रेम सहज मिळतं पण ते नातं जपणं फार अवघड असतं. बिजी लाइफस्टाइलमुळे अनेकदा लोक आपल्या पार्टनरसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा नातं दीर्घकाळ टिकणं अशक्य होतं.
हल्लीच्या काळात तुम्हाला प्रेम सहज मिळतं पण ते नातं जपणं फार अवघड असतं. बिजी लाइफस्टाइलमुळे अनेकदा लोक आपल्या पार्टनरसाठी वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकदा नातं दीर्घकाळ टिकणं अशक्य होतं. एवढचं नाहीतर पार्टनरचं इतर लोकांसोबत मिळून मिसळून राहण्यामुळेही नात्यामध्ये खटके उडतात. परंतु, नातं तुटल्यामुळे दोन लोकांच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम दिसून येतो. हे चांगलं आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचं असू शकतं. जर तुम्हालाही असं वाटतं असेल की, आपलं रिलेशनशिप बराच वेळ टिकत नसेल तर आज आम्ही तुम्हाला काही कारणं सांगणार आहोत. वेळीच ही कराणं लक्षात घेऊन तुम्ही तुमचं नातं तुटण्यापासून वाचवू शकता.
सतत बिझी राहणं तुमची असेल सवय तर...
जर तुम्हाला आपल्या कामामध्ये सतत बिझी राहायला आवडत असेल आणि यामध्ये तुम्ही तुमच्या नात्याकडे दुर्लक्षं करत आहात का? तसेच आपल्या पार्टनरशी न बोलणं त्याला वेळ न देणं यांसारख्या चुका करत असाल तर असं करणं वेळीच टाळा. यामुळे तुमचं नातं धोक्यात येऊ शकतं.
नवीन ठिकाणी पार्टनरचा विसर पडणं
अनेक लोकांना नवीन ठिकाणी फिरायला फार आवडतं. परंतु, त्या ठिकाणी गेल्यावर ते आपल्या जवळच्या लोकांना किंवा पार्टनरला विसरून जातात. तुम्हीही असं करत असाल तर असं करणं वेळीच थांबवा.
ऑनलाइन असूनही पार्टनरला मेसेज न करणं
सध्याचं युग हे इंटरनेटचं युग आहे. इंटरनेटवर मित्रमैत्रिणी भेटतातच पण इंटरनेटवर आयुष्यभरासाठीची नातीही जोडली जातात. अशातच एखाद्या व्यक्तीला स्टॉक करणं अत्यंत सोपं आहे. जर तुम्ही ऑनलाइन आल्यानंतर आपल्या पार्टनरला मेसेज करत नसाल तर हे कारण तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकतं. याचा अर्थ असा नाही की, ऑनलाईन आल्यावर प्रत्येक वेळी पार्टनरला मेसेज करावा. पण तुमच्या बिझी शेड्यूलमधून पार्टनरसाठी वेळ देऊन तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता.
रिस्पॉन्स देणं आहे गरजेचं
जर तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकत असाल पण त्यांचं म्हणणं तुम्हाला समजत नसेल तर या कारणामुळेही तुमचं नातं अडचणीत येऊ शकतं. तुम्हाला त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकून व्यवस्थित समजुन घेणं आवश्यक आहे. तसेच त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर रिस्पॉन्स करणं आवश्यक आहे.
त्यांच्या निर्णयाला महत्त्व देणं
अनेकदा तुम्ही पार्टनरचं म्हणणं ऐकत नाही. तसेच त्यांच्या निर्णयाचा मान राखत नाही. दरवेळी तुम्ही स्वतःची मनमानी करता. जर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा आदर राकला नाही तर त्यांनाही राग येऊ शकतो. आधी त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि त्यानंतर ते चूक की बरोबर ते सोडवा. तसेच कोणत्याही गोष्टीबाबत बोलून तुम्ही मार्ग काढू शकता.
(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.)