पहिल्या भेटीत मुलांच्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष देतात मुली? तुम्हालाही नसेल अंदाज!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 12:39 PM2023-07-01T12:39:04+5:302023-07-01T12:40:27+5:30
Relationship Tips : पहिल्या भेटीत तरूणींच्या मनात नेमकं काय सुरू असतं हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मुली पहिल्या भेटीत मुलांच्या कोणत्या गोष्टी नोटीस करतात.
Relationship Tips : जेव्हा एक तरूण आणि तरूणी पहिल्यांदा भेटतात तेव्हा तो क्षण फारच खास असतो. दोघांच्याही मनात घालमेल सुरू असते. अनेक प्रश्न डोक्यात तांडव करत असतात. पण आजकाल बरंच सोपं झालं आहे. कारण तरूणी आजकाल बिनधास्त बोलू लागल्या आहेत. पण तरूणींच्या मनात त्यावेळी नेमकं काय सुरू असतं हे कुणीही सांगू शकत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, मुली पहिल्या भेटीत मुलांच्या कोणत्या गोष्टी नोटीस करतात.
1) कसे बोलता
सुरूवातीला सगळीच मुलं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी सगळं चांगलंच बोलतात. नंतर रिलेशनशिपच्या काही वर्षांनंतर मुलगा कसा बोलतो याने मुलींना काही फरक पडत नाही. पण पहिल्या भेटीत मुलाची बोलण्याची पद्धत मुली बारकाईने बघतात. जर तुम्ही हॉटेलमध्ये भेटत असाल तर तुम्ही वेटरला कशी हाक मारता हेही त्या नोटीस करतात.
2) परिवाराबाबत काय बोलतात
काही मुली फार पारिवारीक असतात. त्यांना परिवाराला प्राधान्य देणं फार आवडतं. त्यामुळे काही मुली या मुलांमध्ये याही गोष्टींचं निरीक्षण करतात. मुलाच्या आयुष्यात परिवाराचं काय महत्व आहे हे त्या बघतात.
3) दिखावा करता का
जास्तीत जास्त तरूण हे मुलींना इम्प्रेस करण्यासाठी ब्रॅन्डेड कपडे, अॅक्सेसरीज घालून भेटण्यासाठी जातात. सतत स्टेटस आणि महागड्या ब्रॅन्डच्या गोष्टी करतात. यावरून त्याना मुलाच्या स्वभावाचा साधारण अंदाज येतो. अशा मुलांना काही मुली पहिल्या भेटीतच रिजेक्ट करतात. कारण त्यांना साधेपणा आवडतो.
4) बॉडी लॅंग्वेज
पहिल्या भेटीत मुली मुलांच्या बॉडी लॅंग्वेजकडे फार बारकाईने लक्ष देतात. मुलगा कशाप्रकारे चालतो, त्याचे हावभाव कसे आहेत, बसतो कसा, हातांच्या मुव्हमेंट कशा करतो या गोष्टी मुली बारकाईने बघतात. यावरुन त्या मुलगा किती कॉन्फिडेंट आहे हे तपासत असतात.
5) आत्मविश्वास
असं म्हणतात की, आत्मविश्वास ही यशाची पायरी आहे. ही बाब यातही लागू पडते. मुली आत्मविश्वासाच्या मापदंडात तोलत असते. एकदा जर त्यांना विश्वास बसला की, तुमच्या आत्मविश्वास आहे तर त्या तुम्हाला पसंत करू लागतात.
6) ह्यूमर
ह्यूमर मुलींना खूप आवडतो. अशात तुम्ही गंमत करण्यात किंवा त्यांना हसवण्यात किती माहीर आहात हे महत्वाचं ठरतं. ह्यूमर चांगला असणाऱ्या तरूणांवर तरूणी जीव ओवाळतात. त्यांचा बिघडलेला मूड जर तुम्ही लगेच ठीक केला तर तुम्ही जिंकलात असं समजा.
7) लुक
शारीरिक मापदंडानंतर मुली चेहऱ्याच्या फीचरवर नजर टाकतात. सगळ्यांची चॉईस वेगवेगळी असते. तुमचा लुक काही मुलींना आवडू शकतो तर काहींना आवडणार नाही. पण चेहऱ्याची ग्रुमिंग कराल तर फायद्यात रहाल.