जास्त पझेसिव्ह असलेल्या पार्टनरला कसं कंट्रोल कराल? या टिप्स ठरतील फायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 12:56 PM2023-07-31T12:56:45+5:302023-07-31T12:57:11+5:30
Relationship Tips : या पझेसिव्हनेसमुळे नातं तुटण्याचीही भीती जास्त असते. त्यामुळे पझेसिव्ह पार्टनरसोबत कसं वागायचं किंवा डिल करायचं याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Relationship Tips : पझेसिव्हनेस म्हणजे अतिसंवेदनशील असणं हा एक स्वभाव आहे. कधी गर्लफ्रेन्डबाबत तर कधी बॉयफ्रेन्डबाबत याचा उल्लेख केला जातो. काही कपलच्या प्रेमाच्या नात्यात काही काळाने पझिसिव्हनेस येतोच. याचा दोघांनाही त्रास होत असतो. कोणत्याही नात्यात थोडं पझेसिव्ह असणं फायद्याचं आणि गरजेचं असतं, पण ते अधिक प्रमाणात असलं की, समस्या होते. या पझेसिव्हनेसमुळे नातं तुटण्याचीही भीती जास्त असते. त्यामुळे पझेसिव्ह पार्टनरसोबत कसं वागायचं किंवा डिल करायचं याच्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
असं वागण्याचं कारण
प्रत्येक व्यक्तीच्या पझेसिव्ह असण्यामागे काहीतरी कारण असतं. ते कारण नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. बालपणी त्याच्या किंवा तिच्यासोबत काही घडलं असेल म्हणून कदाचित त्यांचा स्वभाव तसा झाला असावा. जर तुम्हाला ते जाणून घेता येत नसेल तर प्रोफेशनल काऊंसेलरची मदत घ्या.
स्पष्ट बोला
तुमच्या पार्टनरच्या पझेसिव्ह वागण्यामुळे तुम्हाला काय वाटतं, हे त्यांना कळू द्या. पण हे सांगण्यासाठी योग्य वेळेची निवड करा. पार्टनरचा मूड कसा आहे हे बघा आणि मग बोला. तुम्हाला त्याच्या किंवा तिच्या अशा वागण्यामुळे काय त्रास होतो हे त्यांना शांतपणे सांगा.
विश्वास द्या
जर पार्टनरचं पझेसिव्हनेस हे कोणत्या असुरक्षिततेमुळे वाढत असेल तर त्याला त्याबाबत सांगा. पार्टनर याचा विश्वास द्या की, तुमचं त्याच्यावर किंवा तिच्यावर खूप प्रेम आहे आणि काळजी करण्यासारखं काहीही नाही. त्याना हेही सांगा की, तुम्ही कधीही त्याचं मन दुखवेल असं काहीही करणार नाही.
कौतुक
तुमचा पती किंवा बॉयफ्रेन्ड किती पझेसिव्ह असला तरी त्याच्यावर चिडण्यापेक्षा त्याने केलेल्या एखाद्या चांगल्या गोष्टीचं कौतुक करा. याने तुमच्या पार्टनरला असलेली असुरक्षितता दूर होईल. त्याने आधी केलेल्या चुका त्याला सतत दाखवू नका.
रागावर नियंत्रण
पझेसिव्ह व्यक्तीसोबत डिल करणं हे काही सोपं काम नाहीये. अशा व्यक्तीसोबत डिल करताना तुम्ही शांत राहणं फारच गरजेचं असतं. अनेकदा बोलता बोलता तुम्हाला राग येईल पण तुम्हाला रागावर कंट्रोल करावं लागेल. याने परिस्थिती आणखी गंभीर होईल.