मुलगी बघायला जाताना या गोष्टींची घ्या काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2018 03:02 PM2018-05-02T15:02:28+5:302018-05-02T15:30:29+5:30
मुलगी बघायला गेल्यावर तिच्या घरचे लोक तुम्हाला बारकाईने बघत असतात. त्यामुळे काही खास गोष्टींची काळजी घ्या.
(Image Credit: Youngisthan. In)
मुंबई : जुळवलेल्या लग्नात मुलीला बघायला जाणं हे सर्वात पहिली आणि महत्वाची प्रोसेस असते. जर तुम्ही लग्न करण्याचा विचार करत असाल किंवा मुलगी बघायला जाणार असाल तर काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. मुलगी बघायला गेल्यावर तिच्या घरचे लोक तुम्हाला बारकाईने बघत असतात. त्यामुळे काही खास गोष्टींची काळजी घ्या.
1) बघायला जात असलेल्या मुलीच्या घरच्यांबाबत पूर्ण माहिती घ्या. घरातील लहान मुलांची नावे जाणून घ्याल तर तुमचं इम्प्रेशन पडेल.
2) कपडे असे घाला ज्यात तुम्ही सहज असाल. जास्त फॅशनच्या फंद्यात विचित्र दिसाल असे कपडे परिधान करु नका.
(पहिल्या भेटीत मुलांच्या 'या' गोष्टी नोटीस करतात मुली!)
3) अनेकदा अनेकजण घाई गडबडीत काहीही बोलतात. हे टाळलं पाहिजे. जे बोलायचं आहे ते विचार करुन बोला. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थही निघू शकतो.
4) सर्वांना आत्मविश्वासाने भेटा. तुमच्या बसण्यात आणि चालण्यात आत्मविश्वास असायला हवा. याने मुलीच्या घरच्यांवर तुमचं इम्प्रेशन पडेल.
5) मुलगी बघायला गेल्यावर सतत फोनवर बोलत बसू नका. फारच अर्जंट असेल तरच फोन घ्या.
(पहिली डेट शेवटची ठरु नये यासाठी खास डेटिंग टिप्स)
6) तुम्हाला तिथे लोक काही प्रश्नही विचारतील. अशात तुम्ही शांतपणे उत्तरे द्या. अशावेळी कुणी काही विचारलंच तर इगो दुखावू देऊ नका. कारण तुम्ही इथे मुलगी बघण्यासाठी आला आहात.
7) तुम्ही आहात तसे राहा. उगाच समोरच्यांना इम्प्रेस करण्यासाठी नाटकी वागू नका. ते कुणी नोटीस केलं तर तुमचं काम अवघड होईल.