छोट्या बहिणीमुळे वाढू शकतं तुमचं वजन - रिसर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 10:57 AM2019-06-10T10:57:11+5:302019-06-10T11:05:11+5:30

जास्त खाणे, वेळेवर न जेवणे, कमी झोप घेणे, फास्ट फूड खाणे, एक्सरसाइज न करणे किंवा आनुवांशिकता ही वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे तुम्हाला माहीत असतील.

Younger sister increases your weight gain chances says research | छोट्या बहिणीमुळे वाढू शकतं तुमचं वजन - रिसर्च

छोट्या बहिणीमुळे वाढू शकतं तुमचं वजन - रिसर्च

Next

जास्त खाणे, वेळेवर न जेवणे, कमी झोप घेणे, फास्ट फूड खाणे, एक्सरसाइज न करणे किंवा आनुवांशिकता ही वजन वाढण्याची वेगवेगळी कारणे तुम्ही अनेकदा ऐकली वा वाचली असतील. म्हणजे वजन वाढण्याची ही वेगवेगळी कारणे तुम्हाला माहीत असताना तुम्हाला जर कुणी येऊन सांगितलं की, तुमचं वजन वाढण्याचं कारण तुमची लहान बहीण आहे. तर तुम्ही यावर हसाल किंवा काय फालतुगिरी आहे, असं म्हणाल. 

(Image Credit : BrightSide)

पण हा दावा आम्ही नाही तर एका रिसर्चमधून करण्यात आला आहे.  नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून समोर आलं की, दोन सख्ख्या बहिणीतील मोठ्या बहिणीचं वजन जास्त असतं. याला एक वैज्ञानिक कारण आहे.

स्वीडिश रिसर्चमध्ये १९९१ आणि २००९ मध्ये जन्मलेल्या बहिणीच्या १३ हजार ४०६ जोडींचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये बघायला मिळालं की, आधी जन्मलेल्या बहिणींमध्ये बीएमआय(बॉडी मास इंडेक्स) अधिक असतो आणि त्यांची लठ्ठ होण्याची शक्यताही अधिक असते. 

या रिसर्चमधून असंही समोर आलं की, परिवारात जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीचं वजन आधी जन्माला आलेल्या मुलीच्या तुलनेत कमी होतं. पण जसजशा दोघी मोठ्या होत गेल्या त्यांचा बीएमआय २.४ टक्क्यांनी वाढला. रिसर्चमध्ये असं आढळलं की, दोन बहिणींपैकी मोठ्या बहिणीचं वजन दोघींच्या तुलनेत २९ टक्के अधिक असण्याची शक्यता असते. म्हणजे त्यांची लठ्ठ असण्याची शक्यता ही ४० टक्के अधिक आहे.

लहान बहीण असल्यावर मोठ्या बहिणीचं वजन वाढण्यामागे वैज्ञानिक कारणही देण्यात आलं आहे. ऑकलॅंड युनिव्हर्सिटीच्या लिंगिंस संस्थेतील प्राध्यापक वेन कटफील्ड यांच्यानुसार, पहिल्यांदा गर्भधारणा झाल्यावर भ्रूणाला पोषक तत्व पुरवणाऱ्या ब्लड वेसेल्स थोड्या पातळ असतात. याने पोषत तत्वांची पुर्तता कमी होते. यामुळे अधिक जमा होण्याचा आणि इन्सुलिनचा धोका असतो. याचा प्रभाव नंतर जीवनावर बघायला मिळतो.

या सिद्धांतानुसार, न्यूयॉर्कच्या लेनॉक्स हिल हॉस्पिटलच्या सेंटर फॉर वेट मॅनेजमेंटच्या निर्देशिका डॉ. मारिया पेना यांनीही त्यांचा तर्क सांगितला. त्या म्हणाल्या की, माता त्यांच्या पहिल्या बाळाच्या हेल्थबाबत फार सजग असतात. अशात त्या बाळांना अधिक स्तनपान करवतात. लहान मुलांमध्ये हीच खाण्याची सवय लाइफटाईम तशीच राहू शकते. त्यासोबतच सिबलिंग रायवलरी सुद्धा वजन वाढण्याची एक शक्यता असू शकते. असेही होऊ शकते की, पहिल्यांदा जन्माला आलेली मुलं ही दुसऱ्यांदा मुलांसोबत खाण्याबाबत कॉम्पिटिशन करतील.

Web Title: Younger sister increases your weight gain chances says research

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.