मोठ्या भावंडांच्या तुलनेत छोटी भावंडं असतात अधिक हसरी - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 11:43 AM2019-03-31T11:43:47+5:302019-03-31T11:46:13+5:30
भावंड म्हटलं की, भांडणं, दंगामस्ती आलीच. एकदा दोघांमध्ये भांडणं झाली तर ती शांत करता करता आई-वडिलांच्या अगदी नाकीनव येतात. अशातच अनेकदा मोठ्या भावंडाची समजूत घालण्यात येते.
(Image Credit : happysnackcompany.co.uk)
भावंड म्हटलं की, भांडणं, दंगामस्ती आलीच. एकदा दोघांमध्ये भांडणं झाली तर ती शांत करता करता आई-वडिलांच्या अगदी नाकीनव येतात. अशातच अनेकदा मोठ्या भावंडाची समजूत घालण्यात येते. 'तू मोठा आहेस.... थोडं समजून घे...' आणि छोट्याला पाठिशी घालण्यात येतं. अनेकदा तर दोघांनाही आईच्या किंवा बाबांच्या हाताने दोन-चार रट्टे देण्यात येतात. पण तरिही भावंडांमधील या लाडिक कुरघोडी थांबण्याचं नाव घेत नाहीत. जशी जशी ही भावंडं मोठी होतात त्यांच्या जबाबदाऱ्या त्यांना समजू लागतात. असं अनेकदा सांगण्यात येतं की, जर भावंडांमध्ये जर भाऊ बहिणीपेक्षा मोठा असेल तर तो अधिक जबाबदार असतो. खरं तर याबाबत कोणी दावा करू शकत नाही.
परंतु जर तुम्ही भावंडांमध्ये वयाने लहान असाल तर तुम्ही मोठ्या भावंडापेक्षा जास्त हसमुख असता. म्हणजेच, या व्यक्ती स्वतः सतत हसत राहतातच पण त्याचबरोबर कुटुंबातील इतर सदस्यांसोबतही दंगामस्ती करता आणि त्यांनाही सतत हसवण्याचा प्रयत्न करतात.
एका संशोधनातून मोठ्या भावंडापेक्षा लहान भावंडं हे सतत हसमुख असतं असा दावा करण्यात आला आहे. एका ग्लोबल ऑनलाइन कम्युनिटीने हे संशोधन केले आहे. या संशोधनातून मोठ्या आणि छोट्या भावंडांच्या स्वभावाबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. तसेच या संशोधनात त्यांच्या जबाबदाऱ्या, कुशलता आणि निश्चय या बाबीही लक्षात घेण्यात आल्या.
सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर संशोधक या निष्कर्षापर्यंत पोहोचले की, मोठ्या भावंडांच्या तुलनेमध्ये छोटी भावंडं कुटुंबियातील सदस्यांचं अधिक मनोरंजन करत असतात.
याव्यतिरिक्त या संशोधनातून आणखी एक गोष्ट समोर आली ती म्हणजे, मोठी भावंडं कुटुंबातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेत असून त्या पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम करतात.
संशोधनातून आलेल्या निष्कर्षांनुसार, आई-वडिल मोठ्या मुलांच्या तुलनेत लहान मुलांच्याबाबतीत जास्त काळजी करतात. तसेच मोठी भावंडं छोट्यांच्या तुलनेत अधिक समजूतदार असतात. त्यामुळेच आई-वडिलांच्या मनात आपल्या मोठ्या मुलांबाबत आदर असतो. ती सतत आपल्या कुटुंबाचा विचार करत असतात.