ऑफिसमुळे पडलाय का तुमच्या वागण्यात बदल?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 04:00 PM2018-09-19T16:00:17+5:302018-09-19T16:02:17+5:30
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कामाचं टेन्शन जास्त असतं. पण कामाचं हे टेन्शन नेहमीसाठी तणाव देणारं असेल तर चिंतेची बाब होऊ शकते. याचा थेट प्रभाव तुमच्या व्यवहारावर पडतो.
(Image Credit : www.huffingtonpost.com)
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये कामाचं टेन्शन जास्त असतं. पण कामाचं हे टेन्शन नेहमीसाठी तणाव देणारं असेल तर चिंतेची बाब होऊ शकते. याचा थेट प्रभाव तुमच्या व्यवहारावर पडतो. जर तुम्ही आता निगेटीव्ह विचार करत असाल आणि मित्र तुमच्या या बदलत्या व्यवहाराची तक्रार करत असतील तर वेळीच सावध व्हा. ऑफिसमधील कामाचा स्ट्रेस कसा ओळखाल आणि त्यावर काय उपाय कराल हे जाणून घेऊया...
ब्रेक घेणं बंद केलंय
जर तुम्ही कामादरम्यान छोटे छोटे खासकरुन लंच ब्रेक घेणेही बंद केले असेल तर, समजा की ऑफिसचं काम तुमच्यावर भारी पडत आहे. जर लंचऐवजी तुम्ही डेस्कवर स्नॅक्स खाऊन काम चालवत असाल तर समजा की तुम्ही स्ट्रेसचे शिकार झाले आहात.
गोष्टी विसरणे
कधी कधी काही विसरणं समजलं जाऊ शकतं. पण नेहमीच तुम्ही काहीना काही विसरत असाल तर ही धोक्याची घंटा आहे. तुम्ही तुमची महत्त्वाची कामे जसे की, रिपोर्ट सबमिट करणे, घरातून निघताना मोबाइल घरी विसरणे अशा अनेक गोष्टी विसरत असाल तर तुम्हाला काही दिवसांच्या सुट्टीची गरज आहे. कारण हे स्ट्रेसचं लक्षण आहे.
नकारात्मक विचार
लाइफस्टाइलसोबतच तुमचे विचारही बदलत आहेत. जर तुम्हाला तुमच्या क्षमतांवर शंका येत असेल आणि काही कठीण निर्णय घेताना तुम्हाला अक्षम वाटत असेल, जबाबदाऱ्यांपासून दूर पळत असाल, तुम्हाला मोटिव्हेशनल काहीच वाटत नसेल तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात असे समजा. अशावेळी तुम्ही मेडिटेशनचा आधार घेऊ शकता.
स्वत:ची चिंता नाही
जर आता ऑफिसला जाताना नीट तयार होत नसाल, आपल्या आरोग्याची काळजी घेत नसाल याचा अर्थ ऑफिसमधील प्रेशर तुमच्या आरोग्यावर प्रभाव टाकत आहे. तुम्हाला वेळीच यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधायला हवा.