तुमचं मुलं खरोखर हुशार आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:58 PM2017-09-22T16:58:37+5:302017-09-22T17:01:26+5:30

इतरांकडे बोट दाखवण्याआधी आपल्या मुलाचं कौतुक करणार की नाही?

 Your kids are really smart. | तुमचं मुलं खरोखर हुशार आहे..

तुमचं मुलं खरोखर हुशार आहे..

Next
ठळक मुद्देमुलांना घालूनपाडून बोलू नका.मुलांचा आत्मसन्मान दुखावेल असं कधीही वागू नका.मुलांच्या कृतीतला संदेश, त्यातला अर्थ समजून घ्या आणि त्याप्रमाणे वागा.

- मयूर पठाडे

प्रत्येक मूल एकदुसºयापेक्षा वेगळं असतं हे तुम्हाला मान्य आहे ना? आपल्या मुलानं एखाद्या क्षेत्रात इतरांपेक्षा चांगली कामगिरी केल्यावर तुमचा ऊर अभिमानानं भरून येतो की नाही? आपल्या मुलाचं कौतुक वाटतं की नाही? पण.. दुसºया कुठल्या तरी क्षेत्रात त्याच्याच मित्रानं, त्याच्याच वर्गातल्या कोणी चांगली कामगिरी केल्यावर लगेच तो मुलगा वाईट कसा काय ठरतो? याचा अर्थ त्या दुसºया मुलाबद्दल तुम्हाला आकस असतो, त्याच्यावर राग असतो किंवा त्याच्याविषयी इर्षा उत्पन्न होते, अशातला प्रकार नाही, पण ‘त्याला’ जमतं, मग तुला का नाही? त्याला जर ते करता येऊ शकतं, तर मग तू का करू शकत नाही?... पालकांची सरबत्ती सुरू होते..
प्रत्येक मूल वेगळं असतं, हे एकदा मान्य केल्यानंतर प्रत्येकाच्या क्षमता, आवडनिवड वेगळ्या असणार आणि प्रत्येकाची त्या त्या क्षेत्रातील कामगिरीही वेगवेगळी असणार हेदेखील निश्चित. त्यामुळे जे इतरांनी केलं, तेच आणि तसंच आपल्या मुलानंही करावं ही अपेक्षाच मुळात चुकीची आहे. या अपेक्षांच्या जंजाळात पालकांनी अडकूही नये आणि मुलामागे तसा धोशाही लावू नये.. तुमचं मूल खरंच हुशार आहे. त्याच्यातली हुशारी ओळखा..
अभ्यासकांनी याबाबत पालकांना सल्ला देताना काय करू नये याबाबत विशेष प्रबोधनही केलं आहे.

पालकांनी काय करू नये?
मुलांचं कितीही चुकलं तरी त्यांना घालूनपाडून बोलू नये आणि त्यांना मारू तर अजिबात नये.
आपल्या मुलांचा आत्मसन्मान दुखावेल असं कधीही वागू नका.
आपलं मूल आपल्या प्रत्येक कृतीतून काहीतरी सांगत असतं. काहीतरी संदेश देत असतं. बºयाचदा ते त्यालाही माहीत नसतं, पण त्याच्या कृतीतला संदेश, त्यातला अर्थ समजून घ्या आणि त्याप्रमाणे वागा.
इतरांसमोर, विशेषत: मित्रमैत्रिणींसमोर मुलांचा अपमान कधीही करू नका.

Web Title:  Your kids are really smart.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.