नात्यात दुरावा येण्याचं कारण फबिंग तर नाही ना? जाणून घ्या काय असतं हे फबिंग...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 02:47 PM2019-01-14T14:47:38+5:302019-01-14T14:52:36+5:30
नात्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी अडचणींचा सामना करावा लागतो. याची वेगवेगळी कारण असू शकतात.
(Image Credit : digest.bps.org.uk)
नात्यामध्ये वेगवेगळ्या कारणांनी अडचणींचा सामना करावा लागतो. याची वेगवेगळी कारण असू शकतात. अशात आता नात्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम फबिंगमुळे होत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्व्हेनुसार, २३ टक्के कपल्समध्ये नात्यात अंतर येण्याचं कारण फबिंग आढळलं आहे. चला जाणून घेऊ काय आहे हे फबिंग आणि याचे नात्यावर होणारे दुष्परिणाम...
काय आहे हे फबिंग?
फबिंगचा अर्थ आहे एखाद्याकडे दुर्लक्ष करणं. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत बोलायचं आहे. पण तो सतत फोनला चिकटून असतो. तो फोनमध्ये इतका गुंतलेला असतो की, तुमच्याकडे बघत सुद्धा नाही. अर्थातच हे वागणं तुम्हाला काय कुणालाच आवडणार नाही. याने नातंही कमजोर होतं. यातून हे दिसतं की, तुमच्या पार्टनरचा इंटरेस्ट तुमच्यापेक्षा जास्त लोकांशी बोलण्यात आहे. ही बाब डोक्याला चांगलीच खटकते आणि यानेच नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. फबिंग हा शब्द दोन वेगळ्या शब्दांना जोडून तयार करण्यात आला आहे. फोन + स्नबिंग = फबिंग. स्नबिंग या इंग्रजी शब्दाचा अर्थ एखाद्याकडे दुर्लक्ष करणे असा होतो.
काय करावे?
जर तुमचा पार्टनर सतत फोनमध्ये डोकं घालून राहतो. पार्टी किंवा मित्रांसोबतही असताना फोनवरच असतो, तर त्याला स्पष्टपणे फोन बंद करण्यास सांगा. फोन नंतर बघायला सांगा. असं तुम्ही नेहमी त्याला सांगत रहाल तर कदाचित त्याची फबिंगची सवय मोडली जाईल.
जशास तसे
तसं तर असं वागणं बावळटपणा असेल, पण समोरच्या व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयी मोडण्यासाठी असं करावं लागतं. जेव्हाही तो तुमच्याशी बोलायला येईल तेव्हा तुम्हीही फोनमध्ये व्यस्त रहा. कदाचित तुमचं हे वागणं पाहून त्याला त्याच्या चुकीची जाणीव होईल. असं वागल्याने तुम्हाला किती त्रास होत असेल हे त्याला कळू शकतं.
आवडत्या विषयावर बोला
जेव्हाही वाटेल की, तुमचा पार्टनर आता फोनमध्ये बिझी होणार आहे. तर त्याआधीच त्याच्याशी त्याच्या आवडीच्या विषयावर बोलणं सुरु करा. ही समस्या दूर करण्याचा एकच उपाय आहे. आणि तो म्हणजे कम्यूनिकेशन. समोरच्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी त्याच्या आवडत्या विषयावर बोलायला सुरुवात करावी.
फबिंगवर बोला
जर तुमचा पार्टनर हे सगळं करुनही फोनमध्ये डोकं घालून बसत असेल तर त्याच्याशी फबिंगबाबत बोला. त्याला विचारा की, जितका वेळ तुम्ही सोबत असता तेव्हा किती वेळ फोनचा वापर करता. तसेच त्याला सांगा की, तुझी ही सवय कशी मोडता येऊ शकते.