तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय, ओळखा ही 5 लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 06:26 PM2018-03-15T18:26:32+5:302018-03-15T18:26:32+5:30

कोणत्याही नात्यामध्ये विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं असतं.मात्र, विश्वासाचा कुणी गैरफायदा घेत असेल तर वेळीच सावध होणंदेखील तितकंच गरजेचं आहे.

Your spouse is cheating you, recognize 5 symptoms | तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय, ओळखा ही 5 लक्षणं

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय, ओळखा ही 5 लक्षणं

googlenewsNext
ठळक मुद्देआपल्या मनातील प्रत्येक लहान-लहान गोष्ट आपण जोडीदाराला सांगतो व मन मोकळं करतो. प्रत्येक मैत्रीच्या मर्यादा असतात. पण आपल्या जोडीदारापेक्षा इतरांशी जास्त जवळीक ठेवणं चुकीचं आहे.व्यक्तीच्या बोलण्यातूनच काहींना त्याच्या मनात सुरू असणाऱ्या विचारांचा सुगावा लागतो.

मुंबई : कोणत्याही नात्यामध्ये विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं असतं. विश्वास हा नात्यातील महत्त्वाचा घटक असतो. प्रेमाची भावनादेखील विश्वासातूनच निर्माण होते. मात्र, विश्वासाचा कुणी गैरफायदा घेत असेल तर वेळीच सावध होणंदेखील तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच तुमचा जोडीदार त्याच्या नेहमीच्या सवयींपेक्षा वेगळं वागताना दिसला, तर तो तुम्हाला फसवत तर नाही ना, याची वेळीच खात्री करून घ्या. खालील दिलेल्या काही लक्षणांवरून तुम्हाला हे सहज ओळखता येईल.

1. तुमच्या जोडीदाराला तुमच्या कोणत्याही गोष्टी न आवडणे - 

आपल्या मनातील प्रत्येक लहान-लहान गोष्ट आपण जोडीदाराला सांगतो व मन मोकळं करतो. पण या सर्व संभाषणात त्याला किंवा तिला सहभागी होण्याची इच्छा नसेल किंवा तुमच्या जोडीदाराला तुमच्यापासून दूर राहणं आवडत असेल तर कुठेतरी पाणी मुरतंय असं तुम्ही समजू शकता. 

आणखी वाचा - या ‘5’ गोष्टी ठेवतात स्त्रियांना कायम आनंदी आणि समाधानी

2. तुमच्यापेक्षा इतर मुला-मुलींशी जास्त जवळीक - 

प्रत्येक मैत्रीच्या मर्यादा असतात. पण आपल्या जोडीदारापेक्षा इतरांशी जास्त जवळीक ठेवणं चुकीचं आहे. काही मैत्रीपलिकडील संबंध नात्यात दुरावा व गैरसमज निर्माण करतात. आपल्या जोडीदाराची आपल्यासोबतची वागणूक व इतरांशी असलेली वागणूक यात तुम्हाला जर फरक आढळला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या नात्याविषयी विचार करणं गरजेचं आहे. 

3. जोडीदाराच्या जीवनशैलीत झालेले अचानक बदल - 

तिला किंवा त्याला अचानक स्वत:मध्ये बदल करून घेण्याची इच्छा होत असेल,  पूर्वी कधीही न केलेल्या गोष्टी करत असेल तर त्याच्या किंवा तिच्यातील या बदलांमागची कारणं तुम्हाला शोधायला हवी. कुठेही बाहेर जाताना पेहरावात किंवा देहबोलीत विचित्र बदल दिसून येत असतील तर तुम्हाला याची माहिती घ्यायला हवी. 

आणखी वाचा - या ‘5’ गोष्टी ठेवतात स्त्रियांना कायम आनंदी आणि समाधानी

4. तुमच्या जोडीदाराची लपवाछपवी - 

व्यक्तीच्या बोलण्यातूनच काहींना त्याच्या मनात सुरू असणाऱ्या विचारांचा सुगावा लागतो. त्याचप्रमाणे काही वैयक्तीक गोष्टी सांगताना तुमचा जोडीदार चाचपडत असेल किंवा तुम्ही काही प्रश्नांची उत्तरे मागितल्यावर समाधानिक उत्तरे मिळत नसतील तर तुमचा जोडीदार तुमच्याशी काहीतरी लपवतोय असं आपण समजू शकतो.  

5. तुमच्या जोडीदाराच्या वागणुकीतून दिसत असलेला निष्काळजीपणा - 

धकाधकीच्या आयुष्यात वेळ मिळाल्यावर आपल्याला जोडीदारासोबत मोकळे क्षण मिळावे असं वाटतं. तसंच आजारी असल्यावर कुणाचीही सोबत नको असली तरी जोडीदाराची सोबत हवीहवीशी वाटते. पण याच काळात जोडीदार तुमच्या सोबत नसेल तर आपल्याला एकटेपणाची व दुर्लक्षित केल्याची भावना मनात येते. म्हणून तुमच्या पडत्या काळात जोडीदार तुम्हाला साथ देत नसेल तर तुम्हाला तुमच्या नात्याविषयी विचार करण्याची गरज आहे.

Web Title: Your spouse is cheating you, recognize 5 symptoms

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.