कोणाला येतो कोणत्या गोष्टींचा राग?; 'हे' ठरतं राशींवरून!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 02:51 PM2019-06-20T14:51:04+5:302019-06-20T14:52:34+5:30
कोणचाही राग आणि चिड दोन्ही गोष्टी अचानक आपल्यासमोर येतात. यामुळे अनेकदा आपल्या जवळची माणसं किंवा काही लोक दुखावले जातात. अनेकदा आपल्यातील राग आपल्या नाआवडत्या गोष्टींमुळे बाहेरे येतो.
कोणचाही राग आणि चिड दोन्ही गोष्टी अचानक आपल्यासमोर येतात. यामुळे अनेकदा आपल्या जवळची माणसं किंवा काही लोक दुखावले जातात. अनेकदा आपल्यातील राग आपल्या नाआवडत्या गोष्टींमुळे बाहेरे येतो. मग ती एखादी वस्तू असो किंवा एखादी घटना. आपल्याला भूतकाळात जर त्यामुळे आपल्याला त्रास झाला असेल किंवा त्यामुळे तुम्ही दुखावले गेला असाल तर तुम्ही त्याचा द्वेष करता.
कधी-कधी हा द्वेष एवढा विकोपाला जातो की, तुम्ही त्याबाबत तुमच्याकडे विचारणा केलीतरी त्या व्यक्तीला अगदी नको-नको ते बोलून त्याच्याशी बोलणचं बंद करता. पण तुम्हाला माहीत आहे का? एखाद्या व्यक्तीला कोणत्या गोष्टींचा किंवा घटनेचा राग असतो हे त्याच्या राशीवरूनही समजतं. जाणून घेऊया राशींनुसार...
मेष राशी
जर कोणी तुमच्याबाबत चुकीच्या गोष्टी बोलत असेल, चुकीचे शब्द उच्चारत असेल किंवा तुम्हाला चुकीचं समजत असेल तर तुम्हाला या गोष्टीचा प्रचंड राग येतो. तुम्हाला चुकीचं समजणाऱ्या गोष्टींबाबत तुम्हाला प्रचंड राग आहे, असं मानलं जातं.
वृषभ राशी
जेव्हा तुम्ही बोलत असाल आणि तुम्हाला कोणी इग्नोर केलं, तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी ऐकल्या नाहीत, तर त्याचा तुम्हाला प्रचंड राग येतो. तुमच्या शब्दांचं व्यर्थ जाणं तुम्हाला अजिबात मान्य नसतं, असं मानलं जातं. त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना त्यांचे शब्द व्यर्थ गेलेले आवडत नाही.
मिथुन राशी
जर तुमची रास मिथुन असेल तर असं सांगितलं जातं की, या राशीच्या लोकांना कोणताही निर्णय घ्यायला आवडत नाही. मग ती कितीही महत्त्वाची गोष्ट असली तरिही तुम्हाला तुमची शांतता भंग करून एखाद्या गोष्टीवर विचार करणं अजिबात मान्य नसतं. त्यामुळे तुमची चिडचिड होते.
कर्क राशी
कर्क राशीच्या व्यक्तींना त्यांच्या गोष्टींना, विचारांना दुय्यम स्थान दिलं तर प्रचंड राग येतो, असं सांगतिलं जातं. जर तुम्ही सांगत असलेल्या गोष्टींकडे कोणी लक्ष देत नसेल किंवा तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने वागत नसेल, तर प्रचंड राग येतो. अशा व्यक्तींचा तुम्ही प्रचंड द्वेष करता.
सिंह राशी
कोणी तुमची गोष्ट बाजूला सारून स्वतःच काही सांगत असेल किंवा ती व्यक्ती तुमच्यापेक्षा वरचढ असल्याचे सतत दाखवत असेल तर तुम्हासा या गोष्टींचा प्रचंड राग येतो. अशा व्यक्तींशी बोलायला किंवा त्यांच्यासोबत काम करायला तुम्हाला अजिबात आवडत नाही.
कन्या राशी
कन्या राशीच्या व्यक्तींना नेहमी परफेक्ट असायला आवडतं, असं मानलं जातं. त्यामुळे त्यांना जी वस्तू, ज्या लोकांमध्ये त्यांना परफेक्टनेस जाणवत नसेल तर ते त्यांचा द्वेष करतात.
तूळ राशी
जर एखाद्या विषयावर तुमच्यासोबत असलेल्या एखाद्या व्यक्तीला कमी माहिती असेल आणि तरिदेखील तो आपल्याच गोष्टी सांगत असेल. तुमची कोणतीच गोष्ट ऐकून घ्यायला तो तयार नसेल. अशा व्यक्तींचा तूळ राशीच्या लोकांना राग येतो, असं मानलं जातं.
वृश्चिक राशी
एखाद्या वस्तूसाठी किंवा गोष्टीसाठी गरजेपेक्षा जास्त पैसे मोजावे लागले तर या राशीच्या लोकांना फार राग येतो. मग ते पैसे असोत किंवा भावना. गरजेपेक्षा जास्त देणं या लोकांना अजिबात मान्य नसतं.
धनु राशी
या राशीच्या लोकांना खोटं बोलणाऱ्या लोकांचा फार राग येतो. पण लोक जर तुमच्याशी खोटं बोलत असतील तर त्यामध्ये चुकही तुमचीच असते. कारण तुम्ही एखाद्या व्यक्तीवर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवता आणि त्यामुळे तुमच्या पदरात धोका येतो.
मकर राशी
जर तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही नेहमी खरं बोलता किंवा नेहमी बरोबर असता. पण जर कोणी तुम्हाला चुकीचं ठरवलं, तर मात्र तुम्हाला या गोष्टीची प्रचंड चिड येते. असं मानलं जातं.
कुंभ राशी
कोणत्याहीबाबतीत कंट्रोल न करण्याच्या परिस्थितीचा तुम्ही द्वेष करता. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवणं आवडतं. परंतु जेव्हा कोणतीही गोष्ट तुमच्या हातातून निघून जाते, त्यावेळी मात्र तुम्हाला प्रचंड राग येतो.
मीन राशी
जर तुम्ही इतरांसाठी मनापासून काम करत असाल, परंतु समोरच्या व्यक्तीकडून नेहमी तुमचा अपेक्षाभंग होत असेल तर तुम्हाला प्रचंड राग येतो. त्यामुळए तुम्ही अशा लोकांपासून दूरचं राहता, असं मानण्यात येतं.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.