'या' ५ राशीचे लोक कधीही सोडत नाहीत पार्टनरची साथ, वाचा कोणत्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 04:15 PM2020-02-16T16:15:03+5:302020-02-16T16:23:36+5:30
रिलेशनशिपमध्ये असताना नात्यात अनेक चढ उतार येत असतात.
(image credit- unsplash)
रिलेशनशिपमध्ये असताना नात्यात अनेक चढ उतार येत असतात. त्यामुळे भांडण होतात. अनेकदा आपली पार्टनर आपल्या सोबत जास्त काळ न राहता ब्रेकअप होतं किंवा आपला पार्टनर आपल्याला सोडून जात असतो. अर्थाच प्रत्येकाच्या वैयक्तीक निर्णयामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा राशींबद्दल सांगणार आहोत. ज्या राशीचे पार्टनर इतर राशींच्या पार्टनरच्या तुलनेत अधिक विश्वासू आणि तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणारे असतात. चला तर मग जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.
कर्क
(Image credit-- blog.woo.hoo.in)
कर्क राशीचे लोक हे आपल्या पार्टनरशी एकनिष्ठ असतात. त्याच्यासाठी त्यांचा सोबती आणि घरातील लोक सगळं काही असतात. रिलेशनशिपबद्दल सांगायचं झाल्यास ते आपल्या नात्यामध्ये खूपच सिक्यॉर आणि एकरूप असतात. आपल्या स्वभावे ते नेहमीच लोकांच मन जिंकून घेत असतात. त्यांचा चांगला स्वभाव कर्क राशीच्या लोकांना परफेक्ट पार्टनर बनवत असतो.
मीन
(image credit- ANI)
मीन राशीचे लोक स्वतः चांगले असतात आणि ते नेहमीच इतरांमध्ये चांगुलपणा शोधत असतात. या राशीच्या लोकांची स्वप्न खूप मोठी असतात. तसंच या राशीचे लोक खूप रोमँटिक असतात. कोणासोबत रिलेशनशीपमध्ये असताना त्यांना खूपच सिक्यॉर वाटत असतं. परफेक्ट पार्टनर बनण्याचा त्यांचा नेहमी प्रय़त्न असतो.
वृश्चिक
वृश्चीक राशीचे लोक आपल्या प्रेमाच्या बाबतीत खूपच पॅशनेट असतात. या राशीचे लोक खूपच लॉयल असतात. एखाद्या सोबत रिलेशनशीपमध्ये आल्यानंतर या राशीचे लोक शेवटपर्यंत साथ देत असतात. कोणत्याही गोष्टी ठरवण्यासाठी या राशीचे लोक वेळ घेत असतात. पण योग्य निर्णय घेतात.
मिथुन (image credit-rozbuzz)
मिथुन राशीचे लोक खूप प्रामाणिक असतात. प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधण्याचं काम मिथुन राशीचे लोक करत असतात. त्यांच्या विचारांना कोणीही व्यक्ती गृहीत धरू शकत नाही. कारण त्यांची विचार करण्याची पध्दत वेगळी असते. त्यामुळे नातेसंबंधात सुद्धा हीच गोष्ट दिसून येते. ( हे पण वाचा-पुरूषांना 'या' तीन चुका पडू शकतात महागात, गर्लफ्रेंड नेहमीसाठी करेल टाटा-बाय बाय!)
तुळ
तुळ राशीचे लोक आपलं रिलेशनशिप नेहमी बॅलंन्स ठेवत असतात. कमिटमेंट पूर्ण करायला त्यांना आवडत असतं. तसंच नातं टिकवून ठेवण्यात त्यांना खूप रस असतो. तसंच आपला पार्टनर शोधण्यासाठी या राशीचे लोक जास्त वेळ घेत असतात. ( हे पण वाचा-Valentines day : 'ती नाही म्हणाली' किंवा 'त्याने नकार दिला' तर कसं पचवाल दुःख?... 'या' टिप्स फायदेशीर ठरतील)