ढाकणेवाडीत १०० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:23+5:302021-07-12T04:17:23+5:30
कोकरूड : ढाकणेवाडी (ता. शिराळा) येथील १८ ते ४४ वयोगटातील १०० टक्के ग्रामस्थांनी पहिली लस घेतली असून ४५ वर्षांवरील ...
कोकरूड : ढाकणेवाडी (ता. शिराळा) येथील १८ ते ४४ वयोगटातील १०० टक्के ग्रामस्थांनी पहिली लस घेतली असून ४५ वर्षांवरील ८० टक्के ग्रामस्थांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. यामुळे गावातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
ढाणकेवाडी गाव गुढे ग्रामपंचायतीखाली असून डोंगरात वसलेले आहे. गेल्या दीड वर्षात या गावात पहिल्या लाटेत एक आणि दुसऱ्या लाटेत पाच असे एकूण सहा रुग्ण सापडले होते. हे सर्वजण काेराेनामुक्त झाले आहेत. यापुढे गावात कोणालाच काेराेनाची बाधा हाेऊ नये याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. लसीकरण सुरू झाल्यानंतर ४५ वर्षांवरील ग्रामस्थांनी मणदूर व चरण प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन सुरुवातीलाच लस घेतली. गावातील ४५ वर्षांवरील सर्व लोकांनी तीन महिन्यांपूर्वीच पहिली लस घेण्याचा बहुमान पटकाविला होता. सध्या ऐंशी टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. येत्या चार दिवसांत लस उपलब्ध झाल्यानंतर गावातील सर्वजण एकाच वेळी लस घेणार आहेत. त्याचबरोबर या गावात राहणाऱ्या १८ ते ४४ वयोगटातील १०० टक्के तरुणांनी पहिला डोस घेतला आहे. १८ वर्षांवरील पहिला आणि दुसरा असे दोन्ही डोस पूर्ण करणारे ढाणकेवाडी हे राज्यातील पहिले गाव आहे.
शंभर टक्के लसीकरणासाठी मणदूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनजित परब तसेच चरण प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वासिम जमादार, डॉ. दिलीप नेर्लेकर यांच्यासह मणदूर, चरण प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांनी मोलाचे सहकार्य केले.
काेट
आमच्या गावातील लोकांनी योग्य काळजी घेतल्याने कोरोना रुग्ण फार कमी संख्येने सापडले आहेत. यापुढेही गावात काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये यासाठी सर्वांनी लस घेण्याची तयारी दर्शविली आहे. प्रशासनाकडून लस उपलब्ध हाेताच उर्वरित ग्रामस्थ लस घेणार आहेत.
- के. वाय. भाष्टे, सामाजिक कार्यकर्ते