जिल्ह्यात १००७ नवे रुग्ण; १४५२ जण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:17+5:302021-06-02T04:21:17+5:30
सांगली : जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येतील स्थिरता मंगळवारीही कायम होती. दोन दिवसांत रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली असलीतरी दिवसभरात १००७ ...
सांगली : जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येतील स्थिरता मंगळवारीही कायम होती. दोन दिवसांत रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली असलीतरी दिवसभरात १००७ जणांना कोरोनाचे निदान झाले तर १४५२ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील चार जणांसह जिल्ह्यातील २६ जणांचा मृत्यू झाला.
सलग तिसऱ्या दिवशी बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत असून मंगळवारी १० नवे रुग्ण आढळून येतानाच एकाचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील २६ जणांचा मृत्यू झाला. त्यात मिरज १, जत, तासगाव तालुका प्रत्येकी ५, वाळवा ३, कडेगाव, शिराळा प्रत्येकी २, आटपाडी, पलूस, कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. महापालिका क्षेत्रातील बाधितांची संख्या कमी होतानाच मृत्यूंची संख्याही कमी झाली आहे.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत २१५५ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ३६८ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर रॅपिड ॲन्टिजनच्या ४७८९ जणांच्या नमुने तपासणीतून ६८१ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.
उपचार घेत असलेल्या ११ हजार ४६२ जणांपैकी १७४८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील १५०७ जण ऑक्सिजनवर तर २४१ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील तिघांचा मृत्यू तर ४२ नवे रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल झाले आहेत.
चौकट
‘म्युकर’चे दहा नवे रुग्ण
म्युकरमायकोसिसची रुग्णसंख्या वाढतानाच मंगळवारी १० नवे रुग्ण आढळून आले तर एकाचा मृत्यू झाला आहे.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ११९३७४
उपचार घेत असलेले ११४६२
कोरोनामुक्त झालेले १०४४६२
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ३४५०
मंगळवारी दिवसभरात
सांगली ९४
मिरज ४४
वाळवा १४०
मिरज तालुका १२२
शिराळा ११५
पलूस ८५
तासगाव ८४
जत ७७
कवठेमहांकाळ ७२
कडेगाव ६०
खानापूर, आटपाडी प्रत्येकी ५७