शिराळा तालुक्यात दाेन दिवसांत १०६ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:22 AM2021-05-03T04:22:13+5:302021-05-03T04:22:13+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यात दोन दिवसांत २७८ चाचण्यांमध्ये कोरोनाचे नवे १०६ रुग्ण आढळून आले. तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे ...
शिराळा
: शिराळा तालुक्यात दोन दिवसांत २७८ चाचण्यांमध्ये कोरोनाचे नवे १०६ रुग्ण आढळून आले. तालुक्यात रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात ५० रुग्ण दाखल केल्याने या रुग्णालयात एकही बेड उपलब्ध नाही.
शनिवार व रविवारी कांदे व मांगले येथे प्रत्येकी ११, शिराळा येथे ९, बेलेवाडी येेथे ८, सांगाव येथे ७, शिंदेवाडी येथे ६, कोकरूड, खवरेवाडी, भटवाडी येथे प्रत्येकी ४, करुंगली, चिंचोली, अंत्री बुद्रुक, बिऊर येथे प्रत्येकी ३, चरण, कापरी, नाटोली, सावर्डे, पाडळेवाडी येथे प्रत्येकी २, देववाडी, धामवडे, फकिरवाडी, कुसाईवाडी, लादेवाडी, मालेवाडी, मानकरवाडी, मिरुखेवडी, पाडळी, पणुंब्रे, शिरशी, तडवळे, वाकुर्डे बुद्रुक, वाटेगाव, अस्वलेवाडी, सावंतवाडी, खराळे, पणुंब्रे तर्फ शिराळा, भाटशिरगाव, कोल्हापूर प्रत्येकी १ असे १०६ रुग्ण आढळून आले. सध्या तालुक्यात ५३८ उपचाराखाली रुग्ण आहेत. मिरज कोविड रुग्णालयात १, शिराळा कोविड सेंटर येथे १० शिराळा कोविड रुग्णालयात ७५, कोकरूड कोविड रुग्णालयात २०, स्वस्तिक हॉस्पिटलात १४, दालमिया सेंटरमध्ये १, होम आयसोलेशनमध्ये ४०७ असे रुग्ण उपचार घेत आहेत. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे.