कर्जमाफीची दहावी यादी अखेर दाखल सात कोटींचा लाभ : सांगली जिल्ह्यातील ३ हजार २३० शेतकरी लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 12:00 AM2018-10-07T00:00:39+5:302018-10-07T00:02:50+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून ज्या यादीची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली होती, ती दहावी कर्जमाफीची यादी शनिवारी प्राप्त झाली. सांगली जिल्हा बँकेच्या ३ हजार २३० शेतकºयांचा यात समावेश असून
सांगली : गेल्या तीन महिन्यांपासून ज्या यादीची प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लागली होती, ती दहावी कर्जमाफीची यादी शनिवारी प्राप्त झाली. सांगली जिल्हा बँकेच्या ३ हजार २३० शेतकºयांचा यात समावेश असून, त्यांना ७ कोटी ५ लाख ७२ हजार रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. या शेतकºयांच्या खात्यावर आठ दिवसात रक्कम जमा केली जाणार असल्याचे बँकेच्यावतीने सांगितले.
राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील दहावी ग्रीन लिस्ट यादी आल्यामुळे शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. योजनेअंतर्गत विहित नमुन्यात जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकºयांची माहिती भरून घेण्यात आली. त्यानंतर वारंवार या योजनेच्या निकषात बदल करण्यात आले. पूर्वी कुटुंब गृहीत धरून जाहीर झालेल्या या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली.
त्याअंतर्गत व्यक्तिनिहाय कर्जमाफी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अनेक कारणांनी हजारो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहिले होते. आता शासनाच्या नव्या निर्णयामुळे यातील काही शेतकºयांना दिलासा मिळणार आहे.
तालुकास्तरीय समितीकडून दुरुस्ती करुन आलेल्या याद्यांची पडताळणी करून राज्य पातळीवरील दहावी ग्रीन लिस्ट जाहीर करण्यात आली. त्यात जिल्ह्यातील जिल्हा बँकेशी संबंधित ३ हजार २३० शेतकºयांचा समावेश करण्यात आला आहे.
सात कोटी पाच लाख ७२ हजार रुपयांची एकूण कर्जमाफी या यादीत दर्शविली आहे. यातील ८३९ जणांना ३ कोटी १९ लाखाची कर्जमाफी, २ हजार ३९१ शेतकºयांना ३ कोटी ८५ लाख रुपयांचे प्रतिशेतकरी २५ हजाराचे अनुदान, तर दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या १८७ शेतकºयांना एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे. त्यांनी १ कोटी ८० लाख रुपये भरल्यानंतर १ कोटी ८१ लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात सुमारे वीस हजार शेतकरी कर्जमाफी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.
जिल्ह्यातील १ लाख ८१ हजार शेतकºयांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरला होता. आत्तापर्यंत १ लाख १७ हजार ८२१ शेतकºयांना २६६ कोटी ६८ लाख रुपयांची कर्जमाफी आणि प्रोत्साहन अनुदानासह ओटीएसचा लाभ मिळाला आहे.
जिल्ह्यातील २८ हजार ३८२ शेतकºयांना १0५ कोटी १९ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. ८६ हजार २६0 जणांना १३२ कोटी ७५ लाखाचे प्रोत्साहन अनुदान मिळाले आहे.
आतापर्यंतची मिळालेली कर्जमाफी
- कर्जमाफीसाठी अर्ज : १ लाख ८१ हजार
- कर्जमाफीचे लाभार्थी : २८ हजार ३८२
- कर्जमाफीची रक्कम : १0५ कोटी
- ओटीएस लाभार्थी : ३,१७९
- प्रोत्साहन अनुदान लाभार्थी : ८६,२६0
- प्रोत्साहन अनुदान रक्कम : १३२ कोटी ७५ लाख
- ओटीएस लाभाची रक्कम : २८ कोटी ७४ लाख