पाडळीतील एकास ११ लाखांचा गंडा; मुकादमास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:24 AM2021-09-13T04:24:53+5:302021-09-13T04:24:53+5:30
शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथील सुखदेव सदाशिव नायकवडी यांची ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून ११ लाख २० हजार ...
शिराळा : पाडळी (ता. शिराळा) येथील सुखदेव सदाशिव नायकवडी यांची ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून ११ लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी गुलाब चंदर भिल (रा. अभानपूर, ता. शिरपूर, जि. धुळे) यास शिराळा पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सुखदेव नायकवडी यांना २०२१ च्या गळीत हंगामासाठी ऊसतोड मजूर पुरवतो असे सांगून गुलाब भिल याने ११ लाख २० हजार रुपये उचल घेतली. मात्र, भिल याने मजूर पुरवले नाहीत व पैसेही दिले नाहीत. त्यामुळे फसवणुकीबाबत ८ एप्रिल २०२१ रोजी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुलाब भिल यास अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांचा पोलीस कोठडीचा आदेश देण्यात आला आहे.