जिल्ह्यात ११२३ नवे रुग्ण; १९ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:22 AM2021-07-17T04:22:11+5:302021-07-17T04:22:11+5:30
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ११२३ जण रुग्ण आढळून आले, तर त्यापेक्षा जास्त १२०९ ...
सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ११२३ जण रुग्ण आढळून आले, तर त्यापेक्षा जास्त १२०९ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील दोघांसह जिल्ह्यातील १७ जणांचा मृत्यू झाला.
गुरुवारी हजारावर असलेल्या रुग्णसंख्येत वाढ झाली, तर मृत्यूसंख्या मात्र कायम राहिली. जिल्ह्यातील १७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात सांगली, मिरज प्रत्येकी २, मिरज तालुक्यात ३, खानापूर, जत तालुक्यातील प्रत्येकी २, आटपाडी, कवठेमहांकाळ, पलूस, तासगाव, शिराळा, वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य यंत्रणेने वाढविलेल्या चाचण्यांचे प्रमाण कायम ठेवत आरटीपीसीआरअंतर्गत ५०२८ जणांच्या नमुन्यांच्या तपासणीत ५३४ जण बाधित आढळले. रॅपिड अँटिजनच्या ९३७४ जणांच्या तपासणीतून ६११ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेत असलेल्या १० हजार १८५ रुग्णांपैकी १०६६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ८९० जण ऑक्सिजनवर, तर १७६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील दोघांचा मृत्यू झाला, तर नवे २२ जण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १६२४३७
उपचार घेत असलेले १०१८५
कोरोनामुक्त झालेले १४७८९७
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४३५५
शुक्रवारी दिवसभरात
सांगली ९७
मिरज २७
आटपाडी ७८
कडेगाव १४१
खानापूर १२७
पलूस ८१
तासगाव ८६
जत ६५
कवठेमहांकाळ २९
मिरज तालुका ११२
शिराळा ४६
वाळवा २३४