शिराळा तालुक्यात 11.5 मि. मी. पावसाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 03:18 PM2020-07-07T15:18:22+5:302020-07-07T15:20:34+5:30
सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 11.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 2.9 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 11.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 2.6 (132.3), तासगाव 2 (139.9), कवठेमहांकाळ 0.3 (207.6), वाळवा-इस्लामपूर 4.5 (173.3), शिराळा 11.5 (387.1), कडेगाव 1 (160.4), पलूस 2.3 (126.7), खानापूर-विटा 2.6 (241.6), आटपाडी 0.0 (153.3), जत 0.0 (79.8)
वारणा धरणात 15.95 टी.एम.सी. पाणीसाठा
जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 15.95 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
शेजारील सातारा जिल्ह्यातील कोयना धरणामध्ये 35.61 टी.एम.सी इतका पाणीसाठा असून धरणाची साठवण क्षमता 105.25 टी.एम.सी, धोम धरणात 5.81 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कन्हेर धरणात 2.93 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., उरमोडी धरणात 5.54 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 9.97 टी.एम.सी, तारळी धरणात 1.99 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 5.85 टी.एम.सी. आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील दूधगंगा धरणात 11.74 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 25.40 व राधानगरी धरणात 3.46 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी.आहे. अलमट्टी धरणात 74.05 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 123 टी.एम.सी. असल्याचे जलसंपदा विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडलेला विसर्ग
कोयना 2111, वारणा 815, कण्हेर 24, राधानगरी 1100, कासारी 250, उरमोडी 500, अलमट्टी 1130.
विविध पुलाच्या ठिकाणी पाण्याची आजची पातळी व कंसात इशारा पातळी
कृष्णा पूल कराड 6.11 (45), आयर्विन पूल सांगली 8 (40) व अंकली पूल हरिपूर 9.6 (45.11).