आडसाली उसाचे एकरी ११७ टन उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:30 AM2021-01-16T04:30:04+5:302021-01-16T04:30:04+5:30
कडेगाव : एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे लक्ष अनेक शेतकऱ्यांनी गाठले आहे. अनेकांनी शंभराचा आकडा ओलांडून पुढे विक्रमी ...
कडेगाव : एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे लक्ष अनेक शेतकऱ्यांनी गाठले आहे. अनेकांनी शंभराचा आकडा ओलांडून पुढे विक्रमी उत्पादनाकडे वाटचालही केली आहे. कडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील विलास शिदू महाडीक या शेतकऱ्याने एकरी ११७ टन ऊस उत्पादन घेतले आहे.
विलास महाडीक यांच्या मळीरान नावाच्या शिवारातील उसाला नुकतीच क्रांती सहकारी साखर कारखान्याची तोड आली होती. १९ गुंठ्यात ५६ टन म्हणजे एकरी ११७ टन उत्पादन घेण्यात त्यांनी यश मिळवले आहे. म्हणजेच गुंठ्याला जवळपास २.९० टन उस उत्पादन घेतले आहे. सोनहीरा खोऱ्यातील चिंचणी गावच्या माळीरान शिवारातील शेतजमीन
अत्यंत उच्च प्रतीची आहे. जवळून सोनहीरा वाहतो, शिवाय चिंचणी तलावाचे पाणी पोटपटाद्वारे शेताच्या बांधावर येते .पाणी भरपूर आहे ,पाटाचे पाणी असल्यामुळे ठिबक सिंचन करता येत नाही. तरीही या शिवारातील बहुतांशी सर्वच शेतकरी आडसाली उसाचे एकरी ८० ते ९० टन ऊस उत्पादन घेतात. विलास शिदू महाडीक हे आपल्या दोन-तीन एकरांत शेती कसतात. त्याचं कुटुंब तसं साधं. आर्थिक परिस्थिती बेताची आहे. मात्र काळ्या कसदार जमिनीत विलास महाडीक यांचे कष्ट व बंधू लालासाहेब महाडीक शेतीवरील यांचे शेतीवरील लक्ष तसेच वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळे हे एकरी ११७ टन उत्पादन घेणे शक्य झाले आहे, असे विलास महाडीक यांनी सांगितले.
चौकट :
सरासरी ४० ते ५० कांडी
चिंचणी येथील विलास महाडीक यांच्या
शेतात ऊसतोड सुरू असताना ऊस उत्पादनात अग्रेसर असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी फडात येऊन पाहणी केली,
उसाच्या कांड्या मोजल्या, व्हिडीओ केले.सरासरी ४० ते ५० कांड्या होत्या, असे येथील शेतकऱ्यांनी व ऊसतोड मजुरांनी सांगितले.
फोटो-१४कडेगाव१
फोटो : ऊसतोड सुरू असताना बांधलेली मोळी मोळी उचलताना शेतकरी विलास महाडीक यांच्यासह शिवारातील शेतकरी व ऊसतोड मजूर.