शिराळा तालुक्यात कोरोनाचे १२ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:29 AM2021-03-23T04:29:02+5:302021-03-23T04:29:02+5:30
शिराळा : शिराळा तालुक्यात सोमवारी नऊ गावांमध्ये कोरोनाचे १२ नवीन रुग्ण आढळून आले. तालुक्यात रुग्ण वाढत ...
शिराळा : शिराळा तालुक्यात सोमवारी नऊ गावांमध्ये कोरोनाचे १२ नवीन रुग्ण आढळून आले. तालुक्यात रुग्ण वाढत असल्याने येथील औद्योगिक शिक्षण संस्थेमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
सोमवारी शिराळा शहर दोन, अंत्री बुद्रुक येथे तीन; तर सांगाव, मांगले, इंग्रुळ, येळापूर, टाकवे, चिंचोली, सावर्डे येथे प्रत्येकी एक असे १२ नवीन रुग्ण आढळून आले आहे. दिवसभरात ११८ ॲण्टिजेन टेस्ट घेण्यात आल्या. तालुक्यात सध्या रेड, मणदूर, टाकवे, कांदे, खिरवडे, रांजणवाडी, सांगाव, मांगले, इंग्रुळ, येळापूर, टाकवे, चिंचोली, सावर्डे
येथे प्रत्येकी एक, शिराळा येथे दोन, अंत्री बुद्रुकला १४ अशा २८ रुग्णांवर घरीच उपचार सुरू आहेत. तर, एक रुग्ण मिरज येथील कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे.
येथील औद्योगिक शिक्षण संस्थेमधील विद्यार्थी वसतिगृहात ३५ बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. यासाठी दोन वैद्यकीय अधिकारी, सहा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तहसीलदार गणेश शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील यांनी येथील व्यवस्थेची पाहणी करून सूचना केल्या आहेत.