शहरातील भोबे गटारीतून निघाला १२ टन कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:28 AM2021-05-27T04:28:52+5:302021-05-27T04:28:52+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील भोबे गटारीतून आतापर्यंत १२ टन कचरा बाहेर काढण्यात आला. यात ...

12 tons of garbage came out of Bhobe sewer in the city | शहरातील भोबे गटारीतून निघाला १२ टन कचरा

शहरातील भोबे गटारीतून निघाला १२ टन कचरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील भोबे गटारीतून आतापर्यंत १२ टन कचरा बाहेर काढण्यात आला. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचऱ्याचा समावेश आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गटारींच्या स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे.

सांगली- कोल्हापूर रोडपासून ते विकास चौकापर्यंत सर्वात लांब भोबे गटार आहे. या गटारीची दरवर्षी महापालिकेकडून स्वच्छता केली जाते. २२ मेपासून चार जेसीबी आणि दहा कर्मचारी यांच्या माध्यमातून या गटारीची स्वच्छता हाती घेण्यात आली. यामध्ये गटारीतील कचरा आणि गाळ जेसीबी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने काढला जात आहे. यात प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या आदींचा समावेश आहे. आजअखेर ७० टक्के स्वच्छता पूर्ण झाली आहे. आतापर्यंत १२ टन कचरा बाहेर काढण्यात आला आहे. उर्वरित स्वच्छतेचे कामसुद्धा गतीने सुरू आहे. या कामाची महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, उपायुक्त राहुल रोकडे यांनी पाहणी केली. या मोहिमेत वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक अंजली कुदळे, वैभव कुदळे, प्रणिल माने, धनंजय कांबळे, कोमल कुदळे यांचा समावेश आहे.

Web Title: 12 tons of garbage came out of Bhobe sewer in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.