जिल्ह्यात कोरोनाचे १२० नवीन रूग्ण; सातजणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:30 AM2021-09-23T04:30:26+5:302021-09-23T04:30:26+5:30

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट होत बुधवारी नवीन १२० रुग्ण आढळले. दिवसभरात १६६ कोरोनामुक्त झाले तर सातजणांचा ...

120 new corona patients in the district; Seven people died | जिल्ह्यात कोरोनाचे १२० नवीन रूग्ण; सातजणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाचे १२० नवीन रूग्ण; सातजणांचा मृत्यू

Next

सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत घट होत बुधवारी नवीन १२० रुग्ण आढळले. दिवसभरात १६६ कोरोनामुक्त झाले तर सातजणांचा मृत्यू झाला.

महापालिका क्षेत्रात कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद न झाल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील ७ जणांचा मृत्यू झाला त्यात तासगाव तालुक्यातील ३, मिरज तालुक्यातील २, आटपाडी आणि पलूस तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य यंत्रणांनी बुधवारी आरटीपीसीआर अंतर्गत २४३२ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात ५८ जण बाधित आढळले तर रॅपिड ॲन्टिजनच्या ३९५३ जणांच्या नमुने तपासणीतून ६५ जण पॉझिटिव्ह आढळले.

उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येतही घट होत असून सध्या १००१ जण उपचार घेत आहेत. त्यातील ३७७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यात २९० जण ऑक्सिजनवर तर ८७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील ३ रुग्ण उपचारास दाखल झाले.

चौकट

आतापर्यंतचे एकूण बाधित १९७४४३

उपचार घेत असलेले १००१

कोरोनामुक्त झालेले १९१२१४

आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५२२८

बुधवारी दिवसभरात

सांगली २१

मिरज ११

आटपाडी ७

कडेगाव ७

खानापूर १६

पलूस १

तासगाव २३

जत ६

कवठेमहांकाळ ५

मिरज तालुका ८

शिराळा ५

वाळवा १०

Web Title: 120 new corona patients in the district; Seven people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.